मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी वृत्तपत्रात प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींसाठी प्रमाणिकरण बंधनकारक

 

 

रायगड दि.4 जिमाका: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी केवळ वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसिध्दीच्या आधी प्रमाणिकरण करुन घेणे उमेदवारांना बंधनकारक आहे.

त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला ॲनेक्चर २७ हा उमेदवार अथवा उमेदवारांने प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीचा अर्ज (अर्जावर स्वत: उमेदवाराची सही अथवा प्रतिनिधीची सही असल्यास त्याबाबत उमेदवाराचे प्रतिनिधी नियुक्त केलेले घोषणापत्र अर्जासोबत हवे), जाहिरात मजकुराची सोबत दोन प्रतीत, जाहिरात तयार करण्यासाठी आलेला खर्च व त्याचे देयक, जाहिरात कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्दीला देणार याबाबतची माहिती व त्याबाबतच्या संभाव्य खर्चाचा तपशील आवश्यक आहे.

मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी (म्हणजेचे दि. 6 मे व 7 मे रोजी) केवळ वर्तमान पत्रात करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसिध्दीच्या दोन दिवस आधी प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक