पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

 

 

रायगड(जिमाका)दि.11:- पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरिता 04 दिवस लागणार असल्याने दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 रोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड व तहसिलदार पोलादपूर यांनी केलेल्या विनंतीनुसार दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 या कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबबात जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.

त्यानुसार नागरिकांनी सदर कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूर-माणगाव ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा व पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान