५ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका) :- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दि.५ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्याकायच्या राजस्व सभागृहात आयोजित केला आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सदर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment