अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव


 

रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका) :- मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांवर मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत कारवाई करत प्रादेशिक परिवहन विभागाने एकूण ३३ वाहने अटकावून/जप्त केली आहेत. संबंधित वाहन मालकांना थकित कर भरण्याबाबत वारंवार कळविण्यात आले असतानाही कर न भरल्याने या वाहनांचा जाहीर ई-लिलाव दि.०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.०० यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे असे कराधान प्राधिकारी तथा सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हरिभाऊ जेजुरकर यांनी कळविले आहे.

जप्त वाहनांमध्ये थ्री व्हीलर (प्रवासी), मोटार कॅब, मॅक्सी कॅब, मालवाहू वाहने, बस, एचजीव्ही डम्पर तसेच दुचाकी यांचा समावेश आहे. ही वाहने सध्या अण्णा पार्किंग, स्टील मार्केट, खिडकपाडा गाव, पनवेल येथे ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, ई-लिलावाच्या तारखेपर्यंत थकितदार वाहन मालकांना कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. वाहन मालक/ताबेदार/वित्तदाते यांनी थकीत मोटार वाहन कर, पर्यावरण कर व शासकीय दंडाची रक्कम कार्यालयात भरून आपली वाहने सोडवून घ्यावीत. तसेच लिलावास हरकत असल्यास दि.२० जानेवारी २०२६ पर्यंत लेखी हरकत नोंदवावी. त्यानंतर कोणतीही हरकत नसल्याचे गृहीत धरून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची सविस्तर यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे. ई-लिलावाच्या अटी व शर्तींची माहिती कार्यालयीन वेळेत उपलब्ध असल्याचेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान