अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

 

रायगड-अलिबाग,दि.04(जिमाका) :- महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अशा जाती-जमातींना, ज्यांना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत कोणताही थेट लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी ‘अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ’ या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ कार्यक्रम दि. 06 मार्च ते दि.08 मार्च 2026 दरम्यान खोपोली येथील लोहाना समाज हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या बाजारपेठेमुळे स्थानिक लघु उद्योजक, लक्षित गट, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, कारागीर व उत्पादक यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी, स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवण्याचे व्यासपीठ आणि स्वदेशी उद्योगांना चालना मिळणारआहे.‘अमृतपेठ ’ही केवळ बाजारपेठ नसून रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा सेतू ठरणार आहे.या उपक्रमाचे नेतृत्व युवा उद्योजक संजय तन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, स्थानिक उद्योजक व व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेआहे.

 

बाजारपेठेत स्टॉल सहभाग,नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शैलेश मराठे 9112228759, अमित कुलकर्णी 9545086551 प्रतिनिधींशी संपर्क साधावा. स्थानिक उद्योजक, स्वयंरोजगार इच्छुक व नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभागी होऊन ‘अमृतपेठ’उपक्रम यशस्वी करावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड