अलिबाग येथे दि.07 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयेाजन

 

रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- अधीक्षक डाकघर, रायगड विभाग यांच्या कार्यालयामार्फत दि.07 सप्टेंबर 2026 रोजी, दुपारी ठीक दुपारी 03.00 वा.डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतींमध्ये, अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्याकडे दि.03 सप्टेंबर 2026 पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी,असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग राजेश रनाळकर यांनी केले आहे.

रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित ज्या तक्रारी/समस्या 6 आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादी सेवांशी संबंधित तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार करण्यात येईल. तक्रारीमध्ये सविस्तर माहिती जसे की तक्रारीचा दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.

विशेष नोंदः त्रैमासिक होणारी डाक अदालत आता दरमहा होणार आहे. दि. 07 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणारी डाक अदालत ही या उपक्रमाची प्रथम डाक अदालत असेल. त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 03.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात येईल, ज्या महिन्यात पहिल्या समोवारी पब्लिक हॉलिडे येईल त्या महिन्यात दुसऱ्यादिवशी डाक अदालत घेतली जाईल. याचे स्वतंत्र वेळापत्रक दिले जाईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन