कर्जत येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

 


 

रायगड-अलिबाग,दि.07(जिमाका): सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला व बाल विकास विषयक जनजागृती  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, भालिवडी, ता. कर्जत येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

   यावेळी कौटुंबिक हिंसाचार कायदा, बालसंगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र, हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रकल्पांची विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. या उपक्रमात सुमारे 550 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमास आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे, जिल्हा सल्लागार समिती सदस्य श्रीमती वैशाली पाटील, संशोधन अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री. अविनाश बदे, चाईल्ड हेल्पलाईनच्या श्रीमती निलाक्षी दगडे, कर्जत तालुका सहाय्यक संरक्षण अधिकारी श्रीमती अस्मिता खंडागळे, पेण प्रकल्पांतर्गत बचत गट, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड