सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्रे व श्रवण यंत्रांचे वाटप

 


 

रायगड-अलिबाग दि.15(जिमाका):राज्यात दि.17 सप्टेंबर ते दि.17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जिल्हा शासकीय रुग्णालय, अलिबाग येथे ‘दिव्यांगजन सहयोग उपक्रम’ राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत  जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते 10 दिव्यांग लाभार्थींना दिव्यांग प्रमाणपत्रे तर 2 लाभार्थींना श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती मते, दिव्यांग विभागाचे सहाय्यक सल्लागार साईनाथ पवार उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ‘सेवा माझे योगदान’ या आरोग्यविषयक सेवा उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या आरोग्यविषयक आणि सामाजिक गरजांसाठी सहकार्य उपलब्ध करून देणे हा होता.

दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे पात्र लाभार्थींना विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ घेण्यास मदत होते. तसेच श्रवण यंत्रांच्या वितरणामुळे श्रवणदोष असलेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक सुलभता निर्माण होण्यास मदत मिळते. या उपक्रमाद्वारे दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध शासकीय सेवा, सुविधा व पुनर्वसनाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास संबंधित अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय, रुग्णालयातील कर्मचारी, समुपदेशक, समाजसेवा अधीक्षक तसेच नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड