निवृत्ती वेतनधारकांसाठी (MAHA-UPLABDHI) एकात्मिक मोबाईल ॲप विकसित जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा
रायगड-अलिबाग दि.15(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नस सुधारणा अंतर्गत वित्त विभागाचे अधिनस्त असलेल्या संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई यांनी राज्यात सर्व कोषागार कार्यालयामधून निवृत्तीवेतन,कुटुंबनिवृत्तीवे
या ॲपद्वारे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा सुलभ,जलद आणि पारदर्शक पध्दतीने मोबाईलद्वारे उपलब्ध करुन देणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. हे ॲप Android व Ios या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
तसेच मोबाईल ॲप संदर्भात काही अडचण असल्यास, निवृत्तीवेतन धारकाचे नाव,पीपीओ क्रमांक,निवृत्तीवेतन जमा होत असलेली बँक व शाखा, निवृत्तीवेतन जमा होत असलेला बँक खातेक्रमांक,मोबाईल क्रमांक (Android/ smart phone) ही माहीती कोषागार कार्यालयाच्या topension-raigad@mah.gov.in ईमेल वर देण्यात यावी.
०००००००००
Comments
Post a Comment