शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे शिल्प निदेशक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

रायगड-अलिबाग, दि.04 (जिमाका) : वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे मशिनिस्ट (Machinist) या  व्यवसायासाठीचे शिल्प निदेशक एक  पद कंत्राटी / तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतींसह दि.12 व दि.13  नोव्हेंबर 2026 रोजी संस्थेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

या पदाकरिता शैक्षणिक पात्रता   व अनुभवाची अट पुढीलप्रमाणे आहे-संबंधित व्यवसायातील पदवी (Degree in Mechanical engg.) व एक वर्षाचा अनुभव किंवा, संबंधित व्यवसायातील पदविका (Diploma in Mechanical engg.) व दोन वर्ष अनुभव किंवा संबंधित व्यवसायातील (ITI Machinist) उत्तीर्ण व 3 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.  निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमानुसार मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित तारखांना संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत द्यावी.

अधिक माहितीसाठी प्राचार्य, वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे  मो.क्र.9423303802/7559294569/ 9769097084/ 9823865840 वर संपर्क साधावा.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड