Posts

शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक -- केंद्रीय मंत्री अनंत गीते

Image
शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक                                                --  केंद्रीय मंत्री अनंत गीते  अलिबाग, दि. 16 (जिमाका) :-      जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्हयात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिले.   केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीस पंचायत समितीत्यांचे नवनिर्वाचित सभापती,उपसभा...

प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त -- केंद्रीय मंत्री अनंत गीते

Image
प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त                                     --  केंद्रीय मंत्री अनंत गीते              अलिबाग दि. 16 (जिमाका):-  युवकांना रोजगार व स्वयंरोजगार करता यावा. नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी  प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त असून ही योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी अशा सूचना केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिल्या. केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत इतर विषयांबरोबरच मुद्रा योजनेचा आढावा घेऊन  मार्गदर्शन करतांना मंत्री...

अभिलेख जतन करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक:- 15/03/2017                                                                                                   वृत्त क्र. 147 अभिलेख जतन करणे  ही महत्वपूर्ण जबाबदारी                                                        ...

महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे

Image
महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक                          --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे अलिबाग(जिमाका), दि.9:- महिला संरक्षण विषयक असलेले कायदे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचवून योग्य त्यावेळी त्यांना त्याचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयक कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला  पोलिस उप अधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे,जेष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या ॲड.निहा राऊत, ॲड.महेश ठाकूर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.             मार्गदर्शन करतांना, डॉ. ...

जागतिक महिला दिन जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम

Image
वृत्त क्र.132                                                                       दिनांक :- 8 मार्च 2017 जागतिक महिला दिन जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम अलिबाग (जिमाका)दि.8:-जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय रायगड अलिबाग यांच्यावतीने अलिबाग तालुक्यातील आगरसुरे ग्राम पंचायत कार्यालय येथे शासकीय उपक्रमांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करुन एक आगळा वेगळा उपक्रम साकारण्यात आला.           यावेळी आगरसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी भोईर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेती प्रणिता गोंधळी, माहिती अधिकारी विष्णू काकडे, ग्रामसेवक जयेश पाटील, जिल्हा माहिती कार्यालया...

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा

Image
दिनांक :- 8 मार्च 2017                                                              वृत्त क्र. 129  जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा  अलिबाग, दि.08 (जिमाका) :-      राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आज जागतिक महिला दिन व महिला मतदार जनजागृती दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद अलिबाग  येथे सर्वोत्कृष्ट आशा  व  व गट प्रवर्तक पुरस्कार सोहळा तसेच आरोग्य  संस्थांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या आरोग्य सेविका, एल.एच.व्ही. व स्टाफ नर्स यांना गौरविण्यासाठी  फलोरेन्स नाईटींगगेल पुरस्कार सोहळा  आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळयास रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, जिल...

जिल्हयात महिला दिन उत्साहात महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम

Image
दिनांक :- 08/03/2017                                                                                                    वृ.क्र 125                                                                     ...