Posts

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,दि.16,(जिमाका):-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 17रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.17रोजी सकाळी नऊ वाजता मुंबई येथून महाड जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी एक व वाजता महाड एमआयडीसी विश्रांतीगृह येथे आगमन. दुपारी दोन वाजता महाड येथून तेटवली ता.दापोली,जि.रत्नागिरीकडे प्रयाण.सायंकाळी चार वाजता तेटवली ता.दापोली येथे आगमन. सायंकाळी सहा वाजता तेटवली येथून नागोठणेकडे प्रयाण. रात्रौ नऊ  वाजता महाराष्ट्र स्कॅमलेस , सुकेली ता.नागोठणे जि.रायगड येथे आगमन.व रात्रौ मुक्काम. शुक्रवार दि.18 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र स्कॅमलेस,सुकेली ता.नागोठणे जि.रायगड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. रविवार दि.20 रोजी सकाळी नऊ वाजता मुंबई येथून महाड कडे प्रयाण. दुपारी एक वाजता महाड विश्रांतीगृह येथे आगमन.दुपारी दोन वाजता महाड येथून रत्नागिरीकडे प्रयाण. 0000000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.16, (जिमाका) :-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.14मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2337.18  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 17.00 मि.मि., पेण-22.30 मि.मि., मुरुड-03.00 मि.मि., पनवेल-30.60 मि.मि., उरण-7.00 मि.मि., कर्जत-03.40 मि.मि., खालापूर-38.00 मि.मि., माणगांव-07.00 मि.मि., रोहा-05.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-00.00 मि.मि., महाड-16.00 मि.मि., पोलादपूर-07.00, म्हसळा-06.20 मि.मि., श्रीवर्धन-6.00 मि.मि., माथेरान-11.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 194.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 12.14मि. मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   74.37 % इतकी आहे. 0000

'आपला जिल्हा रायगड' पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

Image
अलिबाग दि.15 (जिमाका)- रायगड जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या 'आपला जिल्हा' पुस्तिका आणि 'वाटचाल रायगडची' या विविध योजनांचा अंमलबजावणी वरील घडीपुस्तिकेचे प्रकाशन आज  जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मुख्य शासकीय समारंभात हा प्रकाशन सोहळा पार पडला. कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी या पुस्तिकेचे संपादन केले आहे. ०००००

जिल्हा शांतता समिती बैठक सामाजिक सलोखा राखण्यास सर्वांचे सहकार्य आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग दि.15 (जिमाका)- सार्वजनिक उत्सवांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक सलोखा राखण्यास समाजातील सर्व घटकांचे सहकार्य, परस्पर समन्वय आवश्यक आहे. तरी सर्व समाज घटकांनी प्रशासनला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.             गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता कमिटीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देसाई, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.कांबळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता फारुख शेख, कार्यकारी अभियंता माणिकलाल त...

गणेशोत्सव 2017 पूर्वतयारी आढावा बैठक सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
        अलिबाग दि.15,(जिमाका)- गणेशोत्सव काळात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष रहावे. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास प्रतिसादासाठी प्रशासकीय यंत्रणांचा परस्पर समन्वय आवश्यक आहे. हा समन्वय राखून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी नागरिकांना सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.             आगामी गणेशोत्सव 2017 च्या पार्शवभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.  यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देसाई, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे का...

स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात

Image
        अलिबाग, दि. 15 (जि.मा.का.)- स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापनदिनाचा सोहळा आज  येथे उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.              यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,  जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा न्यायाधीश सेवलीकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, उपअधिक्षक गृह राजेंद्र दंडाले,  जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखेडे, उपजिल्हाधिकारी रोहयो प्रेमलता जैतू, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त  प्रसाद खैरनार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित...

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 36 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग दि.15,(जिमाका):-   जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 36.17 मि.मि. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 21.00 मि.मि., पेण-18.00 मि.मि., मुरुड-11.00 मि.मि., पनवेल-32.40 मि.मि., उरण-8.30 मि.मि., कर्जत-34.80 मि.मि., खालापूर-47.00 मि.मि., माणगांव-70.00 मि.मि., रोहा-38.00 मि.मि., सुधागड-48.00 मि.मि., तळा-26.00 मि.मि., महाड-50.00 मि.मि., पोलादपूर-19.00, म्हसळा-37.20 मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-68.00 मि.मि.,-असे आजचे गेल्या 24 तासातील एकूण पर्जन्यमान 578.70 मि.मि.इतके आहे. तर दिवसभरातील एकूण सरासरी पर्जन्यमान 36.17 मि. मि. नोंदविण्यात आले. तर आज अखेर एकूण सरासरी 2325.04 मि. मि इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. जे एकूण सरासरीच्या 73.98 टक्के आहे. ०००००