विशेष लेखः29 कुष्ठरोग निर्मूलनासाठी रुग्ण शोध मोहिम
केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान 2017-18 राबविण्यात येत आहे. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, (नागपूर विभाग), नाशिक, नंदूरबार, जळगांव, धुळे (नाशिक विभाग) अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, (अमरावती विभाग), रायगड, पालघर, ठाणे (ठाणे विभाग) पुणे, सोलापूर (पुणे विभाग), लातूर, उस्मानाबाद, नांदेड (लातूर विभाग) या 22 जिल्ह्यांमधील एकूण 234 तालुक्यांमध्ये 5 सप्टेंबर, 2017 ते 20 सप्टेंबर, 2017 या कालावधीमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार आहे. समाजात सहजा सहजी दिसून न येणारा कुष्ठरुग्ण लवकर आणि विना विकृती शोधून काढून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणण्यासाठी ही कुष्ठरुग्ण शोधमोहिम राबविण्यात येत आहे. सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधणे व त्यांनाही बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत करुन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेद्वारे कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करण्याचा उद्देश आहे. ...