Posts

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.16:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 3185. 39 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 04.00 मि.मि., पेण-05.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-03.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-03.00 मि.मि., सुधागड-01.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-05.00, म्हसळा-05.00मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 99.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.19 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   101.36 टक्के इतकी आहे. 00000

जिल्हा वार्षिक योजना खर्चाचा आढावा विहित वेळेत निधी खर्च करा - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग दि.16,(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयालयाच्या राजस्व सभागृहात  आज झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा वार्षिक योजने मधील प्राप्त निधी, झालेला खर्च याचा आढावा घेतला व विहित वेळेत निधी खर्च करा अशा सूचना संबंधित यंत्रणेना दिल्या. यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार,  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृणाल देवराज, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अधिक्षक अभियंता फारुक शेख,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, शिक्षणाधिकारी माध्यमिक शेषराव बडे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी यावेळी विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेतला.    जिल्हा नियोजन समिती कडून प्राप्त झालेला निधी हा त्याच आर्थिक वर्षात खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अचूक व कालबध्द नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी दिल्या. ...

स्वच्छतेची मोहिम नियमित असावी --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
            अलिबाग दि. 16 (जिमाका)  :- निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून स्वच्छता  मोहिम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे  केले.  निर्मल सागर तट स्वच्छता मोहिम अंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, जिल्हा प्रशासन  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, मेरीटाईम बोर्डाचे प्रधान अधिकारी जसविर सिंग, कंमाडट कोस्टगार्ड अरुण कुमार सिंग  आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाद्वारे  पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे.  त्यानुसार आपण सातत्याने  स्वच्छता मोहिम वि...

जिल्ह्यात पावसाने ओलांडली सरासरी

         अलिबाग,(जिमाका)दि.15-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 42.54 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली.    जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची सर्वसाधारण सरासरी ही 3142.64 मि.मी. इतकी असून आज नोंदविण्यात आलेल्या सरासरी  पर्जन्यमानामुळे ही सरासरी ओलांडून 3179. 20   मि.मी.  इतकी झाली आहे. तर एकूण पावसाची टक्केवारी 101.16% झाली आहे.   आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 58.00 मि.मी, पेण-22.00 मि.मी., मुरुड-16.00 मि.मी., पनवेल-42.60 मि.मी., उरण-18.00 मि.मी., कर्जत-52.60 मि.मी., खालापूर-46.00 मि.मी., माणगांव-60.00 मि.मी., रोहा-58.00 मि.मी., सुधागड-43.00 मि.मी., तळा-11.00 मि.मी., महाड-59.40 मि.मी., पोलादपूर-29.00मि.मी., म्हसळा-05.00मि.मी., श्रीवर्धन-140.00 मि.मी., माथेरान-20.00 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 680.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 42.54 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    ...

महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन:भरपूर खेळा; तंदुरुस्त रहा-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
  अलिबाग, (जिमाका),दि.15- विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन (10 लक्ष) निमित्त रायगड जिल्ह्यातही विद्यार्थ्यांचे फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कुरुळ येथील आरसीएफ विद्यालयाच्या मैदानात फुटबॉल 'किक ऑफ' करुन या सामन्यांचा प्रारंभ केला. 'भरपुर खेळा आणि शारिरीक, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा', असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना दिला. कुरुळ येथील आर.सी.एफ शाळेजवळील मैदानावर आज सकाळी साडेआठ वाजेपासून शाळकरी विद्यार्थ्यांचे फुटबॉल संघ दाखल होऊ लागले होते.  येथे आयोजित आटोपशीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सामन्यांचा प्रारंभ केला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)सुनिल सावंत, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बढे, पोलीस उपअधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाल, आर.सी.एफ.चे  प्रशासकीय व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, तसेच एस.बी. पोटपोसे, डी.टी. चौधरी,  सी.व्ही . तळेगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी अधिकारी तसेच विद्यालय...

अलिबाग येथे 25 रोजी डाक अदालत

अलिबाग,(जिमाका)दि.14:-     भारतीय डाक विभागाच्या अधिक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग या कार्यालयामार्फत सोमवार,दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार,समस्या ज्याचे निवारण सहा आठवडा कालावधीत झालेले   नाही,अशा टपाल, स्पीडपोस्ट्, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक,ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ.असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतीत अधिक्षक डाकघर रायगड विभाग यांचेकडे दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत पोहचतील अशारितीने पाठवाव्या, असे आवाहन अधिक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांनी केले आहे.

पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषि योजनांचा आढावा

Image
अलिबाग,(जिमाका)दि.14-    फलोत्पादनासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाव असून यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून फळबाग क्षेत्र वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यातील कृषि,आत्मा व कृषि सलग्न्   विभागांचा नुकताच आढावा घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती पी.एस. जैतू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग सिगेदार, व 'आत्मा' प्रकल्प संचालक मंगेश डावरे, तसेच कृषि,आत्मा,वनविभाग, पशुसंवर्धन,मत्स्य व्यवसाय, दुग्धविकास व जलसंधारण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, प्रगतशील शेतकरी , स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी  कृषि विभागामार्फत  रा...