Posts

राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

                अलिबाग (जिमाका) दि.29 :- उद्योग व खनिकर्म, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             मंगळवार  दि. 03 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता  बी-6 निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने परहूर पोस्ट कामार्ले ता.अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.   11.30 वाजता संत गाडगेबाबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई संचलित श्री समर्थ संत गाडगेबाबा वृध्दाश्रम परहूर पोस्ट कामार्ले ता.अलिबाग चा नामकरण सोहळा व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी 1.00 वाजता शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह अलिबागकडे प्रयाण. 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग विभाग, पर्यावरण विभाग, खनिकर्म विभागांची आढावा बैठक.  3.00 वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथून रोहाकडे प्रयाण.  साय...

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

                अलिबाग (जिमाका) दि.29 :- बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             शनिवार दि. 30 सप्टेंबर 2017 रोजी रात्रौ 12.00 वाजता डोंबिवली निवासस्थान येथून रोहा जि.रायगकडे प्रयाण.   2.00 वाजता हॉटेल मिराज रोहा येथे आगमन व राखीव.             रविवार  दि. 01 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 6.15 वाजता  हॉटेल मिराज रोहा येथून ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याकडे प्रयाण.  6.30 वाजता ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी  सोहळा येथे आगमन व शासकीय मानवंदना सोहळ्यास उपस्थिती.  9.00 वाजता रोहा येथून पेणकडे प्रयाण.  11.00 वाजता पेण येथे आगमन व भारतीय जनता पार्टी पेण शहर कार्यालयास भेट.  11...

वैधानिक लेखापरिक्षणाअंती 20 टक्के लेखा परिक्षण शुल्क शासनास भरणा केलेल्या सनदी,प्रमाणित लेखापरिक्षकास परत मिळणार

        अलिबाग,(जिमाका)दि.29:-   वैधानिक लेखापरिक्षण अंती शासनाकडे भरणा केलेले 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क् संबंधित सनदि, प्रमाणित लेखापरिक्षकांना दि.30सप्टेंबर 2017 पर्यंत अदा करणेबाबत सुचित केलेले आहे. तरी ठाणे,पालघर व रायगड जिल्ह्यातील संबंधीत सनदी,प्रमाणित लेखापरिक्षक यांनी सहकारी पशु,दुग्ध व मत्स्य संघ संस्थांचे 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क शासनाकडे भरणा केलेल्या चलनांच्या प्रती व संस्थांची यादी तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन गणेश शंकर शिंदे,जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहाकरी संस्था पदुम,ठाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 000000000000

5ऑक्टोबर 2017 रोजी निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा

अलिबाग,(जिमाका)दि.29:-   रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांसाठी दि. 5ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता जंजिरा सभागृह, पोलीस परेड मैदान, अलिबाग येथे   मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर राहावे, असे आवाहन फिरोज मुल्ला, जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 00000

ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 पर्यंत सुट जिल्ह्यातील दिवस जाहीर

अलिबाग,जि.रायगड,दि.29(जिमाका)- केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण)सुधारीत नियम,2017 नुसार नियम 5 उपनियम -3 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी सहा ते रात्रौ बारा वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाद्वारे    प्राधिकृत केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठीचे पंधरा दिवस जाहीर करण्यात आले आहेत. त्यात नमूद करण्यात आलेले नऊ दिवस रायगड जिल्ह्यात यापूर्वीच उपयोगात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे-शिवजयंती-1दिवस,ईद-ए-मिलाद-1दिवस,डॉ.आंबेडकर जयंती-1दिवस,1 मे-1दिवस, महाराष्ट्र दिन-1दिवस, होळी पोर्णिमा-1दिवस, गणपती उत्सव-4दिवस (दुसरा,पाचवा दिवस,गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी) या सणांकरीता ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम,2017 ची अधिसूचना लागू करण्यात आली होती.             त्यानंतर उर्वरित सहा दिवस निश्चित करुन त्यांची ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण)सुधारीत नियम,2017 अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नवरात्...

पत्रपरिषदः मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे- श्रीमती पुदलवाड

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.29(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी तसेच दि.1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर  आधारीत  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम व सेनादलातील मतदारांच्या यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांनी मतदार यादीत आपले नाव व तपशिलाबाबत माहिती नोंदवून घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करुन पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी देण्यात आलेली माहिती याप्रमाणे- मा.भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार दि.1 नोव्हेंबर 2017 या अर्हता दिनांकावर  कोकण विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या  मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची यादी तयार करण्याचे वेळापत्रक - मतदार नोंदणी जाहीर सुचना प्रसिद्धी दिनांक  गुरुवार दि.28 सप्टेंबर 2017 वर्तमान पत्रातील पुर्नप्रसिद्धी (प्रथम) दिनांक शुक्रवार दि.13 ऑक्टो...

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

Image
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमीनीवर संशोधन करणारे एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची स्थापना 1943 मध्ये कृषि संशोधन केंद्र म्हणून झाली नंतर आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर 1959 मध्ये कृषि संशेाधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प या योजनेतून अंशत: योजना-1 आणि योजना-1 यामधून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रामध्ये विभागण्यात आले आहे. पनवेल प्रक्षेत्राचे क्षेत्रफळ 12.8.2016 हेक्टर आणि पारगांव प्रक्षेत्राचे क्षेत्रफळ20.24 हेक्टर इतके आहे.    पनवेल व पारगांव हि प्रक्षेत्र कोकणातील रायगड जिल्ह्यातील असून येथे सरासरी पाऊस 2500 ते 3000 मि.मि. पडतो.सरासरी कमाल 33 ते 38 सें.ग्रे. आणि किमान 24.5 ते 29.0 तापमान सें.ग्रे. एवढे असते. तसेच आद्रता 79ते 96 %एवढी असते. कोकणातील चार जिल्ह्यात अंदाजे 65.485 हे.इतके क्षेत्रफळ खार जमिनीखाली आहे. त्यापैकी 85टक्के ...