Posts

राष्ट्रीय एकता दौड मंगळवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल  यांची जयंतीनिमित्त ( दि.31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस व  त्याच दिवशी स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंगळवार दि.31 रोजी सकाळी 8 वा. राष्ट्रीय एकता दौड अलिबाग शहरातून आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार दि.  31 रोजी   सकाळी आठ ते नऊ या   वेळेत कुलाबा किल्ला ते बस स्थानक या मार्गावर Run For Unity अर्थात राष्ट्रीय एकता दौड होईल.  त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळात प्रत्येक शासकीय कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवसाची व संकल्प दिनाची सामुदायिकरित्या शपथ होईल. यावेळी शाळास्तरावर सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्र दर्शन,नाट्य,संगीत स्पर्धा,गावांतील प्रतिष्ठांची भाषणे होतील. सायंकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे नियंत्रणात Long March (परेड)   आयोजित करण्यात आली आहे. तरी या कार्यक्रमांस शहरातील नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी, खेळाडू यांनी मोठ्या संख्य...

नेहरु युवा संघटनेमार्फत युवकांसाठी कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- केंद्र शासनाने   युवक व पौगंडावस्थेतील मुलांच्या विकासासाठी नेहरु युवा संघठन दिल्ली या संस्थेने युवकांसाठी   NPYAD या योजनेअंतर्गत विविध संस्थांकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.साहसी शिबिर,ॲडव्हेंचर (साहसी प्रकारासाठी अर्थसहाय्य),जीवन कौशल्य् शिक्षण,युवा नेतृत्व् व व्यक्तीमत्व् विकास प्रकल्प कार्यक्रम राबविणे.या उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमासाठी विविध संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी 20 दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत आहेत. पत्ता-नेहरु युवा केंद्र संघटन,स्कोप मिनार कोअर-आयव्ही 2 रा मजला,लक्ष्मी नगर जिल्हा केंद्र, विकास मार्ग दिल्ली या ठिकाणी किंवा   projectnyks@gmail.com   या ई-मेल वर पाठवावेत. अधिक माहितीसाठी व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अलिबाग यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,महादेव कसगावडे यांनी केले आहे. ०००००

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा-2017-18:किक बॉक्सिंग स्पर्धेस आज प्रारंभ:राज्यभरातील 550 खेळाडूंचा सहभाग

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26 -   महाराष्ट्र   शासनाच्या   क्रीडा   व   युवक   सेवा   संचालनालयाच्या   वतिने   प्रतिवर्षी   राज्यामध्ये   शालेय   विद्यार्थ्यासाठी   जवळपास   ७५   खेळांच्या   १४ ,   १७   व   १९   वर्षाआतील   मुले   व   मुलीअशा   वयोगटात   स्पर्धांचे   आयोजन   करण्यात   येते .   या   स्पर्धा   तालुका ,   जिल्हा ,   विभाग   व   राज्यस्तर   या   क्रमाने   आयोजित   करण्यात   येतात .   सन   २०१ 7 - १ 8   या   वर्षात   आयोजित   करावयाच्या   राज्यस्तर   स्पर्धापैकी ‘किक बॉक्सिंग’   याखेळाच्या   राज्यस्तर   शालेय   क्रीडा   स्पर्धांचे   आयोजन   करण्याची   संधी   संचालनालयाने   रायगड   जिल्ह्यास   उपलब्ध   करुन   दिलेली   आहे . जिल्हा   क्रीडा   पर...

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना:ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर पर्यंत स्विकारणार

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-   पर्जन्यमानातील दोलायमानता आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमिवर शेतीचे जलव्यवस्थापन ही बाब अत्यंत संवेदनशील झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे किफायतीशीर वापर करुन उत्पादकतेत वाढ करणेसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होऊन सिंचनद्वारे खते व किटकनाशकांचे व्यवस्थापन करणे शक्य होईल. ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास तणांचे नियंत्रण तसेच आंतरमशागत व्यवस्थापन सुलभ होऊन पिकावर किड व रोगांचा प्रार्दुभाव कमी प्रमाणात झाल्यास पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होईल. यासाठी सन 2017-18   करीता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म् सिंचन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे अर्ज या वेबसाईटवर ई-ठिंबक आज्ञावली मध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे दिनांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत स्विकारले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे केलेल्या अर्जाची व त्यात नमूद केलेल्या अभिलेखांची (7/12,8अ,बॅक पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत,आधारकार्ड इ.बा...

प्रवाशांची सुरक्षा महत्वाची ----जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
अलिबाग दि.25 :- रायगड जिल्ह्यातील नॅशनल हायवे तसेच ग्रामीण भागात जाणारे रस्ते यावर होणारे अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉट शोधून प्रवाशांची सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे दालनात आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पासरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, कार्यकारी अभियंता राष्ट्ीय महामार्ग विभाग महाड एस.के.सुरवसे, वाहतूक नियंत्रक मनोजकुमार म्हात्रे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हेमांगी पाटील व संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील  ब्लॅक स्पॉट बाबत उपाययोजना करण्यासाठीच्या निधीची तरतूद, अंमलबजावणीचे वेळापत्रक अंमलबजावणीसाठी जबाबदार शिर्ष अधिकारी यांची निश्चिती करावी.  तसेच   जिल्ह्यातील रस्त्यावर असलेल्या अधिकृत व अनधिकृत गतीरोधकांचाही आढावा घेण्यात आला.    अपघात कमीत कमी होण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी गतीरोधक तयार केले आले आहेत.  या गतीरोधकांना...