Posts

केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते, हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे - शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता महाड एमआयडीसी येथे आगमन. दुपारी दोन वाजता महाड येथून खेड, जि.रत्नागिरी कडे प्रयाण. रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सायं साडे सात वाजता अलिबाग येथे आगमन  व मुक्काम. सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीस उपस्थिती. दुपारी दोन वाजता अलिबाग येथून मोटारीने मुंबई कडे प्रयाण. 000000

मुरुड येथून युवक बेपत्ता

Image
  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 - उत्तरप्रदेश येथील मैनुद्दीन शहाबुद्दील खान  वय 30 रा पिठनी, तहसिल नवगड,जि.सिद्धार्थनगर,राज्य सध्या रा. मनिष विरकुड  यांची चाळ, मुरुड येथून  दिनांक 20 सप्टेंबर 2015 रेाजी सकाळी नऊ  वाजता त्याचा रुम पार्टनर मुहम्मद् इलियास  याला राजपुरी येथे कामाला जात आहे असे सांगून निघून गेला तो आजतागायत परत आला नाही.  तसेच त्याचा मुरुड शहरात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला परंतु आजपर्यंत तपास लागला नाही असे मैनुद्दीन शहाबुद्दील खान  यांचे मेहूणे मोहमद फारुख खान यांनी मुरुड पेालीस ठाणे येथे तक्रार नोंदविली आहे.  त्याचे वर्णन याप्रमाणे- मैनुद्दीन शहाबुद्दील खान हा अंगात मध्यम , रंग निमगोरा, उंची 155 से.मी.   अंगात नेसूस नीळया  रंगाची जिन्स्,सफेद फुलशर्ट, नाक सरळ, भाषा इंग्रजी,हिंदी व मराठी आहे. 20 सप्टेंबर 2015 रेाजी हरवला आहे. तरी  मैनुद्दीन शहाबुद्दील खान  कुठे मिळाल्यास किंवा दिसल्यास 8308718760 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे पोलीस निरिक्षक  मुरुड पोलीस ठाणे यांनी कळविले आहे. ००...

पर्यटनासाठी आलेला युवक बेपत्ता;माहिती कळविण्याचे आवाहन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 - औरंगाबाद येथील अमोल शिवहरी नागरे वय 26 वर्षे रा.प्लॉट नं.10 सर्वे नं.68 मोहटदेवी मंदिराजवळ,जयभवानी नगर औरंगाबाद रंग गोरा,शरीर सडपातळ,उंची-6 फुट,अंगात नेसूस शॉट  निळया रंगाची,तर लाल रंगाची हाप बनियान तसेच डाव्या हातात बालाजीचा लाल रंगाचा धागा असून बोली भाषा इंग्रजी,हिंदी व मराठी आहे. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी तो मित्राबरोबर काशीद बीच येथे  ता.मुरुड जि.रायगड येथे फिरण्यासाठी आला होता.तो व त्याचे मित्र समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता तो खोल पाण्यात जावून दिसेनासा झाला आहे. तरी  अमोल शिवहरी नागरे कुठे मिळाल्यास किंवा दिसल्यास पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे एन.आर.गिरी, यांनी कळविले आहे. संपर्कासाठी भ्रमणध्वनी व मोबाईल क्रमांक-मुरुड पोलीस स्टेशन-02144-274033, निलेश गिरी पोलीस हवा.मुरुड पोलीस ठाणे- 9922866684,8983404442,शिवहरी नागरे-9404618146,8999175411 . ०००० 

‘आत्मा ’चा उपक्रम : शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती गट प्रर्वतक प्रशिक्षण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रसायनयुक्त शेतीपासून परावृत्त होऊन नैसर्गिक पद्धतीच्या सेंद्रीय शेतीकडे वळून विषमुक्त अन्न,धान्य,भाजीपाल्याच्या उत्पादनाकडे वळावे यासाठी कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)मार्फत आज सेंद्रीय शेती गट प्रर्वतक प्रशिक्षण पार पडले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद् घाटन अलिबागचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी.बी.शेळके, आत्माचे प्रकल्पसंचालक एम.एस.डावरे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी भारत नांदगांवकर,चिफ मॅनेजर मंदार वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना आ.पंडितशेठ पाटील म्हणाले की, सेंद्रीय शेती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन पिके सुचवावीत. शेतकऱ्यांनी बाजारात सेंद्रिय मालाला असणारी मागणी लक्षात घेऊन उत्पादन घ्यावे. बाजाराच्या मागणीनुसार पुरवठा करुन आर्थिक फाय...

शुभ वर्तमानः एच आय व्ही संक्रमणाचा टक्का घटतोय...

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- जागतिक एडस दिन  1 डिसेंबर रोजी आहे. यानिमित्ताने एचआयव्ही संसर्ग आणि एडस यासंदर्भात जनजागृती होत आहे. एचआयव्ही एडस या आजाराने मानवाला या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर गाठले. हा आजार मानव समाजापुढे एकूण सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रश्न घेऊन आला. या प्रश्नांवर गेल्या 20 वर्षांतील अथक प्रयत्नांनी मानवी समाज उत्तरे शोधण्याचा प्रयत्न  करतोय. आणि त्यात मानवाला यश आलंय, हा दावा ठामपणे करता येतोय. रायगड जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर  एचआयव्ही संसर्ग होण्याचे प्रमाण 42 टक्क्यांवरुन 0.49 टक्के इतके खाली आले आहे. आता हे प्रमाण शून्यावर आणणे हे आपल्या समोरील आव्हान आहे, त्यासाठी जनसामान्यांनी आरोग्य यंत्रणांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करुन खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल. मागील चौदा वर्षाचा (सन 2003 ते 2016)अभ्यास करता सन 2003 मध्ये 827 गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेश व तपासणी केली असता त्यामध्ये 6(0.7) एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असल्याचे आढळून आले. सन 2016 मध्ये एकूण 44052 इतक्या गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली असता ...

जागतिक एडस पंधरवाडा; जिल्हाभरात विविध कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांचे मार्फत जागतिक एड्स व पंधरवाड्यानिमित्त रायगड जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.30 नोव्हेंबर,  रोजी सकाळी साडेसात वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते होणार आहे. दुपारच्या सत्रात पीएनपी कॉलेज वेश्वी अलिबाग यांच्यामार्फत आयोजित एनएसएस कॅम्प सहाण येथे एचआयव्ही समुपदेशन मार्गदर्शन, तपासणी तसेच पथनाट्य सादरीकरण करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 1 डिसेंबर, रोजी सकाळी 10 वाजता आनंदीबाई प्रधान कॉलेज नागोठणे येथे आयपीसीएल कंपनी नागोठणे यांचे मार्फत एचआयव्ही / एड्सविषयी माहिती मार्गदर्शन तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एआरटी केंद्र अलिबाग यांचेमार्फत एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरीता स्नेहमेळावा तसेच धिरु...

निवडणूक प्रश्नमंजूषा स्पर्धा-२०१७;खालापूरची आश्विनी जाधव प्रथम

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आंतरशालेय निवडणूक प्रश्न मंजूषा स्पर्धेचे (National Election Quiz, Inter School Contest 2017-18) आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावर पार पडलेल्या या स्पर्धेत खालापुर येथील आश्विनी अन्साजी जाधव ही स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आंतरशालेय निवडणूक प्रश्न मंजूषा स्पर्धा 2017-18 अंतर्गत रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये इ. 9 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा सर्व तालुक्यांत घेण्यात आली. तालुकापातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेत 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  या विद्यार्थ्यांची एक जिल्हास्तरीय परीक्षा आज जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कुल, अलिबाग येथे घेण्यात आली. या परीक्षेस  16 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या परीक्षेमध्ये कु. आश्वीनी अन्साजी जाधव, स्वामी विवेकानंद विद्या...