राष्ट्रीय लोक अदालत जिल्ह्यात 258 प्रकरणे निकाली
अलिबाग,(जिमाका)दि.11- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाराष्ट्रातील उच्च न्यायालये व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, इतर सर्व न्यायालये व न्यायाधिकरणे येथे शनिवार दि.9 रोजी 'राष्ट्रीय लोक अदालत' आयोजित करण्यात आली. या लोक अदालतीसमोर आलेल्या प्रकरणांपैकी 258 प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे. या लोक अदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा सदस्य सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एल.डी.हुली, डी.आर.देशपांडे,दिवाणी न्यायाधीश व. स्तर पनवेल यांचे व जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, इन्श्युरन्स कंपन्या,बँका आणि वकील वर्ग उपस्थित होते. सदर लोक अदालतीचे कामकाज सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यं पर्यंत सुरु होते. लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघण्याच्या दृष्टीने सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतमध्य...