Posts

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 12:- जिजाऊ माँ साहेब  व स्वामी विवेकानंद यांच्या  जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.              यावेळी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उप जिल्हाधिकारी (सा.प्र.)श्रीधर बोधे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच जिल्हा माहिती व सूचना अधिकारी चिंतामणी मिश्रा तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ वेटकोळी व जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 00000 

हातमाग निर्मिती प्रशिक्षण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 12:- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग संचालक,हातमाग संस्था, पुणे येथे हातकागद निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी सन 2017-18या आर्थिक वर्षामध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात  आलेले आहे. इयत्ता आठवी,एस.एस.सी.एच.एस.सी. पर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या किंवा ज्यांना प्रशिक्षण करण्याची इच्छा असलेल्या व 18 ते 45 वयोगटांतील इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व अन्य दाखल्यांसह संचालक, हातकागद संस्था, कृ.बा.जोशी पथ, शिवाजीनगर,पुणे- 411005, फोन नं.020-25538838 या पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड अलिबाग यांनी केले आहे.  00000

अलिबाग तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12- शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पायाभूत प्रशिक्षणा अंतर्गत आज अलिबाग तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खरेदी प्रक्रिया व ई-टेंडर या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. तहसिल कार्यालयाच्या कुलाबा सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. यशदा या संस्थेच्यावतीने रामेती खोपोली या संस्थेने हे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अलिबाग सर्जेराव सोनावणे, नायब तहसिलदार संदिप पानमंद, संस्थेच प्राचार्य पी.डी.सिगेदार आदि मान्यवर उपस्थित होते. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये  कार्यक्षमता आणून व गतिमान प्रशासन करण्याकरीता सर्वांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. 23 सप्टेंबर, 2011 नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना पायाभूत प्रशिक्षण दिले जाते तर त्यापूर्वीच्या कर्मचाऱ्यांना उजळणी प्रशिक्षण दिले जाते. गरजांवर आधारीत निरंतर प्रशिक्षण देण्यात येते.   महाराष्ट्र राज्याचा प्रशिक्षण धोरणानुसार राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था तथा प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती...

राज्यपालांचे आगमन व स्वागत

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- 30 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2018 च्या समारोप समारंभासाठी मा.राज्यपाल सी.विद्यासागर यांचे खांदेश्वर नवी मुंबई हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पनवेल महानगर पालिका आयुकत सुधाकर शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. 00000

30 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप नवी आव्हाने पेलण्यासाठी पोलिसांनी अधिक स्मार्ट होणे आवश्यक -राज्यपाल सी. विद्यासागर राव

Image
                अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11:- सोशल मिडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे सामाजिक सलोख्याला धोका होऊन निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अधिक स्मार्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांना सोशल मिडीयासंदर्भात अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन अद्यावत करणे आवश्यक आहे. तरच आपले राज्य सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राखून प्रगतित पुन्हा अग्रेसर राहिल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे  केले. राज्य पोलीस दलाच्या 30व्या क्रीडा स्पर्धांच्या समारोपप्रसंगी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी श्री. विद्यासागर येथे उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.             नवी मुंबई येथील सिडको क्रीडा मैदानावर आयोजित कार्यक्रमास राज्याचे पोलीस महासंचालक संजय बर्वे, अपर मुख्य सचिव गृह सुधीर श्रीवास्तव, अपर महासंचालक प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज,...

परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 11:- ना.दिवाकर रावते, परिवहन मंत्री, खारभूमी विकास हे शुक्रवार दि.12 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा  जिल्हा दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शासकीय निवासस्थान मेघदूत येथून शासकीय मोटारीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. सकाळी आठ वाजता गेट ऑफ इंडिया येथून स्पीड बोटने मांडवा, अलिबागकडे प्रयाण. साडे आठ वाजता मांडवा अलिबाग येथे आगमन व महर्षी विनोद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ:दि.बा.पाटील महाविद्यालय, अलिबाग). सकाळी अकरा वाजता मांडवा अलिबाग येथून स्पीड बोटने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. साडे अकरा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय निवासस्थान मेघदूत कडे प्रयाण. 00000

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती महाविद्यालयीन स्तरावरील प्रलंबित अर्ज 15 पर्यंत निकाली काढण्याच्या सुचना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 11:- भारत सरकारतर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण परिक्षा फि दिली जाते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांतील प्रलंबित अर्ज येत्या सोमवार दि.15 पर्यंत निकाली काढावयाचे आहेत. या संदर्भात समाज कल्याण आयुक्त, पुणे यांनी 9 जानेवारी 2018 रोजी परिपत्रकाद्वारे सुचना निर्गमित केल्या आहेत. तरी महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी दि.15 पर्यंत अर्ज मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच महाविद्यालयाकडील प्रलंबित पात्र विद्यार्थी हे शिष्यवृत्ती तसेच शिक्षण  व परिक्षा फी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांची राहील. तरी 2015-16 व 2017-18 या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत,असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. 0000