Posts

सोमवारपासून जिल्ह्यात शाळा प्रवेशात्सव

अलिबाग, जि. रायगडदि.10(जिमाका) :-   बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009  ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभागाकडून दि.17 जून ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात दि.17 जून रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शाळा पूर्व दिवशी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होणार आहे. प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकांवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकांची यादी लाऊडस्पिकवर घोषित करुन शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या गृहभेटींचे आयोजन करण्यात आले आहे.  शाळेचा गावकऱ्यांच्या सहाय्याने परिसर स्वच्छ करुन सडा रांगोळी व पाना फुलांनी सुशोभित करण्याचे नियोजन करण्...

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश

अलिबाग, जि. रायगडदि.10(जिमाका) :-   नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पोलीस ठाणेचे हद्दीत वाकडी, वलप,पाले बुद्रुक व दिघाटी ग्रामपंचायती पोट निवडणूका, एनआरआय पोलीस ठाणेचे हद्दीत उलवे व तरघर, पनवेल पोलीस ठाणेचे हद्दीत वडघर तसेच न्हावाशेवा पोलीस ठाणेचे हद्दीत गव्हाण ग्रामपंचायत अशा एकूण आठ या ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका तसेच उरण पोलीस ठाणेचे हद्दीत आवरे व गोवठणे ग्रामपंचायत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका व मोठी जुई, चांणजे व वेसवी ग्रामपंचायत पोटनिवडणूक तसेच मोरा पोलीस ठाणेचे हद्दीत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत पोटनिवडणूका अशा एकूण 2 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक व 12 पोटनिवडणूका होणार असून रविवार दिनांक 23 जून रोजी मतदान व सोमवार दिनांक 24 जून रोजी मतमोजणी होणार आहे.   सदर निवडणूक प्रक्रीया शांत ,   निर्भयपणे व नि:पक्षपाती पार पाडण्यासाठी   महाराष्ट्र पोलीस अधिनियम , 1951   चे कलम   134 प्रमाणे मनाई आदेश प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत,असे   नवी मुंबईचे पोलीस आयुक्त   संजय कुमार   यांनी कळविले आहे. ...

मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी मोफत वसतीगृह सुविधा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -     सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनीकरिता मुलींचे शासकीय वसतिगृह हे गोंधळपाडा अलिबाग येथे कार्यरत आहे. येथे इयत्ता 8 वी पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती 80 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागास वर्गीय दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के व अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.   वसतिगृहात विद्यार्थ्यांकरिता मोफत निवास व भोजन व्यवस्था आहे. वह्या, पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.   शालेय व गणवेश पात्र विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो.   या व्यतिरिक्त संगणक,ग्रंथालय सुविधा, क्रीडासाहित्य, मनोरंजन इ.अनेक सुविधा उपलब्ध आहेत.   प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून उत्पन्न, अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थीनीकरित...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 6.19 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-1.00 मि.मि., माणगांव-9.00 मि.मि., रोहा-12.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-23.00, म्हसळा-1.00मि.मि., श्रीवर्धन-1.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 83.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.19 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   0.20 टक्के इतकी आहे. 0000

जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता मोफत प्रवेश

अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- सामाजिक न्याय व दि.विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्याकरिता मोफत प्रवेश दिला जात आहे.             या शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे आरक्षण आहे.   अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, अपंग प्रवर्ग 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के.    शासकीय निवासी शाळेची वैशिष्टये पुढीलप्रमाणे- शाळा विभाग व निवासकरिता स्वतंत्र इमारती.   शासनामार्फत विनामूल्य राहण्याची, जेवाणाची सोय.   विनामूल्य गणवेश व शैक्षणिक साहित्य आणि निवासी साहित्य.   सुसज्य ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य खेळाचे मैदान व क्रीडा साहित्य, डिजिटल स्कूल,म्युझिक सिस्टीम व दुरदर्शन संच.             कार्यालयात उपलब्ध्‍ प्रवेश अर्ज विहित नमुन्यात पुढील का...

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे   आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.             शनिवार दिनांक 8 जून रोजी सकाळी साडे आठ वा. डोंबिवली निवासस्थान येथून खालापूर, जि.रायगडकडे प्रयाण.    दहा वा. वावोशी ता.खालापूर येथे   आगमन व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती.   दुपारी एक ते दीड वा. राखीव.   दीड वा. वावोशी ता.खालापूर येथून अलिबागकडे प्रयाण.   अडीच वा. अलिबाग येथे आगमन व भाजपा जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : मेघा टॉकीज,चेंढरे अलिबाग.   सायं. सहा वा. अलिबाग येथून पलावा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. 000000

शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज रायगड

Image
किल्ले रायगड, ता. महाड, जि.रायगड,दि.6 (जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी उपस्थित हजारो शिवप्रेमींनी केलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुर्गराज रायगड दुमदुमला. शिवकाळात घेऊन जाणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या सोहोळ्याला राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण,माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, किल्ले रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे, बल्गेरियाचे राजदूत एलेनोरा दिमित्रोवा, तुनुशियाचे राजदूत नेजमेद्दिन लाखाल, पोलंड दूतावास सल्लागार दामियान इरझिक व श्रीमती इव्हा स्टॅकिन्किझ, चिन दुतावासाचे सल्लागार ल्यू बिंग आणी डॉ. संग झिंपू आ.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी,शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सर्वत,महाडचे प्रांताधिकारी इनामदार, तहासिलदार पवार, नायब तहसिलदार कुडल आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहोळ्यामध्ये छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान...