Posts

निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

रायगड अलिबाग दि.23, (जि.मा.का.) –विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीच्या   मतमोजणी तयारी पूर्ण झाली आहे. 138 मतमोजणी पर्यवेक्षक, 141 मतमोजणी सहाय्यक, 144 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची   मतमोजणीसाठी   नियुक्ती करण्यात आली आहे.   निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे.     188- पनवेल   के . ई . एस . इंदूबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम विद्यालय , पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 24 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 आहे.   27 मतमोजणी पर्यवेक्षक, 27 मतमोजणी सहाय्यक, 27 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची   मतमोजणीसाठी   नियुक्ती करण्यात आली आहे.   189- कर्जत   श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय ,   किरवली कर्जत   येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 आहे.   18 मतमोजणी पर्यवेक्षक, 21 मतमोजणी सहाय्यक, 20 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची   मतमोजणीसाठी   नियुक्ती करण्यात आली आहे.   190 - उरण...

विधानसभा निवडणूक मतमोजणी तयारी पूर्ण

रायगड अलिबाग दि.22, (जि.मा.का.) –विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीच्या   मतमोजणी तयारी पूर्ण झाली असून   मतदारसंघनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे-     188- पनवेल   के . ई . एस . इंदूबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम विद्यालय , पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 24 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 अशी आहे. ,   189- कर्जत   श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय ,   किरवली कर्जत   येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 अशी आहे.   190 - उरण   रा . जि . प . मराठी शाळा जासई येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 अशी आहे 191- पेण   के . ई . एस . लिटील एंजल स्कूल झी गार्डन शेजारी ,   पेण येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 14 व मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 27 अशी आहे.   192- अलिबाग   जिल्हा क्रीडा संकुल नेहुली ,   ये...

रायगड जिल्हा निवडणूक प्रशासनाने केली रुग्ण मतदारांसाठी खास रुग्णवाहिकेची सोय

Image
रायगड अलिबाग दि.21, जिल्हाधिकारी   तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी अलिबाग येथील सिव्हील हॉस्पीटल मधील रुग्णांना अलिबाग पासून दहा ते वीस कि.मी.च्या परिसरातील मतदान केंद्रावर रुग्णवाहिकेद्वारे पोहचवून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे मतदान करण्यासाठी जावयाचे आहे. त्यांच्यासाठी चार रुग्णवाहिकेची सुविधा सिव्हील हॉस्पीटल व नगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे. आता पर्यंत आठ रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. 00000

वोट कर रायगडकर…. घोषणांनी दुमदुमले अलिबाग

Image
रायगड अलिबाग दि.19, : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत.  याच कार्यक्रमांतर्गत अलिबाग बीच येथून अलिबाग शहरात भव्य वॉकेथॉन रॅली काढण्यात आली.   वोट कर रायगडकर…. चला मतदान करु या….लोकशाही मजबूत करु या…आपका वोट आपकी ताकद…एकच लक्ष्य मताचा हक्क…. मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो…या घोषवाक्यांनी अलिबाग बीच व शहर दुमदुमून गेले. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून या वॉकेथॉन रॅलीला अलिबाग बीच येथून सुरुवात झाली. आज सकाळी साडेसात वाजता अलिबाग बीच येथून सुरुवात होऊन रायगड जिल्हा परिषद,श्री समर्थ स्नॅक कॉर्नर,अलिबाग अर्बन बँक को.लि.,स्टेट बँक ऑफ इंडिया,अरुण कुमार वैद्य, जा.र.ह.कन्याशाळा, युनियन बँक, नगररचना कार्यालय, बस स्टँण्ड, रेवदंडा नाका, शेतकरी भवन,ठिकरुळ नाका, शिवाजी पुतळा,जामा मशिद,चावडी मोहल्ला,पोस्ट ऑफीस, अलिबाग बीच येथे रॅलीचा सांगता झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक...

190-उरण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल

रायगड अलिबाग दि.19, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता 190- उरण विधानसभा मतदार संघात सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00   ते सायं.6.00 वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.   या अनुषंगाने पुढील मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे. तरघर-1-मु.तरघर, पो.उलवा, तरघर, मु.मोहाचापाडा पो.उलवा तलघर येथील केंद्र क्र.2 चे रा.जि.प.मराठी शाळा तरघर पश्चिमेकडील खोली क्रमांक 2   हे मतदान केंद्राचे   जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे नोड सेक्टर क्र.25 पश्चिमेकडील खोली क्र.1 हे मतदानाचे नवीन ठिकाण आहे. तरघर-2-वरची आळी पो.उलवा, कोंबडभुजे,आलवारीस वाडी (बाजार), पो.उलवा, कोंबडभुजे, शाळेच्या बाजूला,पो.उलवा, अंगणवाडीच्या बाजूला, पो.उलवा कोंबडभुजे, खालची आळी, पो. उलवा कोंबडभुजे, कातकरीवाडी, पो.उलवा कोंबडभुजे मारु मंदिर समोर पो.उलवा कोंबडभुजे येथील केंद्र क्र.3 चे रा.जि.प.मराठी शाळा कोंबडभुजे उत्तरेकडील खोली क्रमांक 2   हे मतदान केंद्राचे जुने ठिकाण होते. त्याऐवजी रा.जि.प.शाळा सिडको नवीन इमारत उलवे ...

जिल्ह्यात मनाई आदेश

रायगड अलिबाग दि.19, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करिता जिल्ह्यात सोमवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी   7.00 ते सायं.   6.00 यावेळेत मतदान होणार असून गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान मोजणी होणार आहे.    त्या अनुषंगाने   निवडणूकीचे मतदान व मतमोजणी कार्यक्रम शांततेत   व सुरळीत पडावे आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजाविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे व आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेऊन फिरण्यास, मतदान केंद्राच्या 100 मी. परिसरात मोबाईल, पेजर अथवा कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल असे कोणतेही कृत्य करण्यास   अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973   चे कलम 144 नुसार मनाई आदेश जारी केला आहे. हा मनाई आदेश जिल्ह्याच्या हद्दीतील 189-कर्जत, 190-उरण (जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यक्षेत्रापुरती), 191-पेण, 192-अलिबाग,193-श्रीवर्धन, 194-महाड व...

जिल्ह्यातील निजामपूर जि.प.गट व आंबेवाडी पं.स.गण पोटनिवडणूक मतदार यादी कार्यक्रम

अलिबाग (जिमाका) दि.19:- जिल्ह्यात माणगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.45-निजामपूर व रोहा तालुक्यतील पंचायत समिती 80-आंबेवाडी निर्वाचक गणामध्ये पोटनिवडणूकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 04/10/2019, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणूकीकरीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरीता प्रसिध्द करण्याचा दिनांक 02/11/2019, मतदार यादी संदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 06/11/2019, निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख 08/11/2019, निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख 08/11/2019, मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द करणे दिनांक 11/11/2019 असा आहे असे तहसिलदार (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.