Posts

कुटूंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा प्रदात्यांचा गौरव समारंभ संपन्न

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका)- जिल्हा शल्य चिकित्सक रायगड-अलिबाग यांच्या तर्फे व इनजेंडर हेल्थ या संस्थेमार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या कुटूंब नियोजन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट संस्था व सेवा प्रदात यांचा गौरव समांरभ कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या उपस्थितीत हॉटेल साई इन रेवस रोड, चोंढी येथे संपन्न झाला.               यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, डॉ.अनिल फुटाणे, डॉ.सुचिता गवळी, डॉ.श्रीम.सिंग, जिल्हा माता   व बालसंगोपन अधिकारी डॉ.चंद्रकांत जगताप, शल्य चिकित्सक माणगाव डॉ.कामेरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ माणगाव डॉ.सिध्दी कामेरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अडतमोल, जिल्हा विस्तार माध्यम विस्तार अधिकारी जि.प.राजेंद्र भिसे, इनजेंडर हेल्थ या संस्थेचे डॉ.सागर खांडेकर, नम्रता दोषी, कांक्षा सिंग, श्याम गायकवाड आदि उपस्थितीत होते.             आरोग्य संस्था व सेवा प्रदाते यांना त्यांच्या चांगल्या कामग...

न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग व जिल्हा नियोजन समिती रायगड-अलिबाग यांच्या सहकार्याने आणि मॅट्रीक्स कॅड ॲकॅडमी खारघर यांच्यामार्फत जिल्हा कारागृह अलिबाग येथे न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी याच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.                 यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, कारागृह अधिक्षक जिल्हा कारागृह अलिबाग ए.टी.पाटील, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग एस.जी.पवार आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, न्यायाधीन,शिक्षाधीन बंद्यांनी येथून बाहेर गेल्यानंतर आपल्या कुटूंबांसाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याकडे कोणतातरी स्क्रील असला पाहिजे यासाठी हे इलेक्ट्रेशन प्रशिक्षण महत्वाचे आहे. याकरिता शासनाचा हा उपक्रम आपल्यासाठी असून यात मनलावून सहभागी होऊन काम करावे. ...

31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह वाहन धारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण   रायगड व रायगड जिल्हा पोलीसदल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहास दि.11 जानेवारी पासून प्रारंभ झाला असून वाहन चालविताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन धारकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.   पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात आयोजित 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 कार्यक्रमात ते बोलत होते.               यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण श्रीमती उर्मिला पवार,सहायय्क पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा रायगड शहाजी शिरोळे आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, वाहन चालवितांना   होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रत्येकाने वाहन चालव...

नारी शक्ती पुरस्कार नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2020

अलिबाग दि.9, विशेषत: अपवादात्मक परिस्थितीमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या क्षेत्रांमध्ये किंवा या विषयाशी संबंधीत किंवा आनुषंगीक उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत. 01/11/2019 रोजी ज्या व्यक्तीचे वय किमान 25 वर्षे आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधित   क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना उपक्रम हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत. पारंपारीक व अपारंपारीक क्षेत्रामध्ये कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभूत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती इ. अपारंपारिक क्षेत्रामध्ये ठसेपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोग्य व निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर व प्रतिष्ठा इ. बाबत कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना, उपक्रम यांन...

शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल -पालकमंत्री आदिती तटकरे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.09 (जिमाका) -   दुसऱ्या महायुध्दात अभुतपूर्व शौर्य दाखवून आपल्या देशाची धाडसी परंपरा दाखवून देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या माणगाव तालुक्यातील पळस गावचे शहीद वीर   यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी आज येथे दिली.    माणगाव   येथील जुने तहसिलदार कार्यालय येथे आयोजित शहीद वीर यशवंतराव घाडगे व्हिक्टोरिया क्रॉस मानचिन्हधारक ( मरणोत्तर) यांच्या जयंती समांरभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.   यावेळी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा श्रीमती योगिता चव्हाण, ब्रिगेडियर सुधीर सावंत, कर्नल सी.जे.रानडे, बेळगाव येथील सुभेदार अनिल भोसले, उपविभागीय अधिकारी माणगाव श्रीमती प्रशाली दिघावकर, तहसिलदार श्रीमती प्रियांका अहिरे आदि उपस्थित होते. यावेळी   पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील अनेक सुपूत्रांनी...

वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव

अलिबाग (जिमाका)दि.7:- सदर जाहीर नोटीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोंदणी प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे.   सदर नोटिशीद्वारे वाहन मालकाना, ताबेदारांना वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे.   वायुवेग पथकांनी वेळोवळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतूदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असताना देखील सदर वाहनांच्या मालकानी या कार्यालयास तसे कळविले नाही. त्यासाठी ही जाहीर नोटीस जारी करण्यात येत आहे. वाहनाच्या मालकांनी, ताबेदाराना, वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दि.18/01/2020 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दि.22/01/2020 रोजी दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तद्नंतर वाहन मालकाची कोणत...

रायगड जिल्हयात विषय समिती सभापती पदासाठी 15 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी

अलिबाग (जिमाका)दि.7:- रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्राची छाननी कार्यक्रम बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. छाननी पत्र तपशिल पुढील प्रमाणे- 1.) विषय समिती सभापती पदासाठी नामनिर्देशनपत्रे   दाखल करणे- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत. ठिकाण- कै.प्रभाकर पाटील सभागृह, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग 2.) विषय समिती सभापती पदाचे निवडीसाठी बैठक- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी दुपारी दोन वाजता. 3.) प्राधिकृत अधिकारी यांचेमार्फत दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे.- बुधवार दि.15 जानेवारी 2020 रोजी दुपारी दोन वाजता बैठक सुरु झाल्यानंतर. 4.) वैधरित्या नामनिर्देशन उमेदवारांची नावे त्यांच्या सूचकासह वाचून दाखविणे - नामनिर्देशन पत्रांची छाननी   पूर्ण झाल्यानंतर. 5.)उमेदवारी मागे घेणे- अ.क्र.4 व 5 चे काम पूर्ण झाल्यानंतर., 6.) आवश्यक असल्यास विषय समिती सभापती (एक) पदासाठी निवडणूक घेणे.-अ.क्र.4 व 5 चे काम पूर्ण झाल्यानंतर.7.) आवश्यक असल्यास विषय समिती सभापती (दोन)पदासाठी निवडणूक घेणे- अ.क्र.6 चे काम पूर्...