Posts

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.98 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1415.18 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 13.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-1.40 मि.मि., उरण-4.00 मि.मि., कर्जत-3.60 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-6.00 मि.मि., रोहा-21.40 मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-11.00 मि.मि., महाड-20.00 मि.मि., पोलादपूर-24.00, म्हसळा-7.00मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-3.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 143.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 8.98 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 44.00 टक्के इतकी आहे. 00000

सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता कोविड केअर सेंटर उपयुक्त ठरणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न

Image
अलिबाग,जि.रायगड, दि.25 (जिमाका) : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, संचालक हितलभाई मेसवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात 50 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.           नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन संकुलात रिलायन्स इंडस्ट्रीजने उभारलेल्या   50 बेडची   क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या   ई-उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.               यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, नागोठणे रिलायन्स मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे,एचआर हेड चेतन वाळंज हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, ...

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :-   रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,    अंबा नदी (नागोठणे बंधारा)- 4.05 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट हिकावती मंदिर)-1.90 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.30 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-42.90 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)- 2.00 मी. इतकी आहे.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद

             अलिबाग,जि.रायगड दि.25 (जिमाका) :-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.63 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 1406.21 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 19.00 मि.मि., पेण-7.00 मि.मि., मुरुड-9.00 मि.मि., पनवेल-1.00 मि.मि., उरण-6.00 मि.मि., कर्जत-4.40 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-3.00 मि.मि., रोहा-2.30 मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-1.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-7.00मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-5.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 154.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.63 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 43.72 टक्के इतकी आहे. 00000

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.             रविवार दि.26 जुलै, 2020 दुपारी 2.30 वा. मंडणगड जि.रत्नागिरी येथून मोटारीने महाड, जि.रायगडकडे प्रयाण. दु.3.00 वा. महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळाचे शासकीय विश्रामगृह, महाड येथे आगमन व राखीव. दु.3.15 ते 4.15 वा.के.एस.एफ.कॉलनी महाड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे प्रस्तावित कोविड केअर सेंटरची पाहणी.   सायं.5.15 वा. उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे कोविड केअर सेंटरची पाहणी. सोयीनुसार सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.             सोमवार दि.27 जुलै 2020 रोजी सकाळी 11.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून नागोठणेकडे रवाना. स.11.45 वा. नागोठणे येथील प्रस्तावित ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात उभारलेल्या 100 बेड मर्यादेच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शनिवार, दि. 25 जुलै 2020 रोजी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.   पालकमंत्री कु.आदिती तटकरे या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्या या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहणार असून जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, आमदार भरत गोगावले, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.अभय ससाणे तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या कोविड केअर सेंटर मध्ये 100 बेडची क्षमता असून कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक जागा भारतीय एज्युकेशनने पुरविली असून रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आवश्यक सोयी-सुविधांनुसार अद्ययावत वैद्यकीय सामुग्री, निष्णात डॉक्टर्स, इतर सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.   येथील संपूर्ण कार्यवाही ही शासकीय नियमानुसार होणार असून हे सें...

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व इतर कामकाज 27 जुलै पासून होणार सुरु

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी रायगड व उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पेण यांनी दि.15 ते 26 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ व कायम अनुज्ञप्ती कामकाज, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज व इतर कामकाज स्थगित करण्यात आले होते.   मात्र आता दि. 26 जुलै 2020 रोजी लॉकडाऊन संपत असल्यामुळे   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथील शिबीर कार्यालयातील कामे वगळता अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्ती नुतनीकरण, पत्ता बदल, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे सुरु करण्यात करण्यात येणार आहेत. या सर्व कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणालीवर (अपॉईटमेंट) निर्धारित करणे आवश्यक राहील.   शिकाऊ अनुज्ञप्ती व ड्रायव्हिंग टेस्टसाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्क व हॅण्डग्लोव्हज घ...