Posts

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने थांबविले महाड तालुक्यातील दोन बालविवाह

    रायगड-अलिबाग,दि.08(जिमाका ) :-  महाड तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील दोन अल्पवयीन बालिकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जि ल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त पथकाच्या समन्वयाने होणारे 2 बालविवाह थांबवले. कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांना बालविवाह बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलींच्या वयाची खात्री केली असता त्या दोन्ही मुलींचे वय अनुक्रमे  16  वर्षे 8 महिने व  16  वर्षे 1 महिना असल्याचे आढळून आले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम  2006  नुसार मुलीचे विवाहाचे वय किमान  18  वर्षे मुलाचे वय  21  वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर विवाह बालविवाह असून तो कायद्याने बेकायदेशीर ठरत होता त्यामुळे वरील माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवला. या  प्रकरणी अल्पवयीन बालकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालिकांचे वय  18...

तळा नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर घालणारी ठरेल -- उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
  रायगड-अलिबाग,दि.05(जिमाका ):- नग रपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही तळा शहराच्या  वैभवात भर घालणारी, दर्जेदार आणि भविष्याचा विचार करून उभारण्यात येईल तसेच या प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळा येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष श्रीमती माधुरी घोलप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरपंचायत सदस्य-सदस्या, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळा तालुक्याला विशेष महत्त्व आहे. तळागड किल्ला हा मराठा ...

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव

  रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका ) :-   मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांवर मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत कारवाई करत प्रादेशिक परिवहन विभागाने एकूण ३३ वाहने अटकावून/जप्त केली आहेत. संबंधित वाहन मालकांना थकित कर भरण्याबाबत वारंवार कळविण्यात आले असतानाही कर न भरल्याने या वाहनांचा जाहीर ई-लिलाव दि.०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.०० यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे असे कराधान प्राधिकारी तथा सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हरिभाऊ जेजुरकर यांनी कळविले आहे. जप्त वाहनांमध्ये थ्री व्हीलर (प्रवासी), मोटार कॅब, मॅक्सी कॅब, मालवाहू वाहने, बस, एचजीव्ही डम्पर तसेच दुचाकी यांचा समावेश आहे. ही वाहने सध्या अण्णा पार्किंग, स्टील मार्केट, खिडकपाडा गाव, पनवेल येथे ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, ई-लिलावाच्या तारखेपर्यंत थकितदार वाहन मालकांना कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. वाहन मालक/ताबेदार/वित्तदाते यांनी थकीत मोटार वाहन कर, पर्यावरण कर व शासकीय दंडाची रक्कम कार्यालयात भरून आपली वाहने सोडवून घ्यावीत. तसेच लिलावास हरकत असल्यास दि.२० जानेवारी २०२६ पर्...

५ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

                 रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका ) :-   जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा होतो. माहे जानेवारी २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दि.५ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्याकायच्या राजस्व सभागृहात आयोजित केला आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सदर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी कळविले आहे. 000000

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

Image
  रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका ) :-  कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांचा व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, याउद्देशाने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व विषेश कारागृह महानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता कौशल्य विकास कार्यक्रम (DPC २०२५-२६), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अलिबाग, जिल्हा उद्योग केंद्र, अलिबाग यांच्यामार्फत पुरुष बंद्यांना दुचाकी मोटार सायकल दुरुस्ती व महिला बंद्यांकरीता ब्युटिपार्लर बेसीक व अॅडव्हांन्स कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण , रायगड-अलिबाग श्रीम.तेजस्विनी निराळे, जिल्हा कौशल...

रोहा तालुक्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्याकामी दि.03 जानेवारी रोजी विशेष मोहीम

  रायगड-अलिबाग,दि.31(जिमाका):-  जिल्ह्यात पावसाळयामध्ये माहे जून ते ऑक्टोबर 2025 या महिन्यांत सतत पाऊस असल्या कारणाने मोजणी काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे उप अधीक्षक भूमि अभिलेख रोहा कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत. या मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमि अभिलेख कोंकण प्रदेश मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड यांच्याडून या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्याकामी विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यामध्ये 126 प्रकरणे दि.03 जानेवारी 2026 या एकाच दिवशी मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांनी या दिवशी उपस्थित राहून आपल्या जमिनींची मोजणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड सुनिल इंदलकर यांनी केले आहे.  उप अधीक्षक भूमि अभिलेख रोहा कार्यालयाकडे माहे नोव्हेंबर 2025 अखेर एक...

जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

    रायगड-अलिबाग,दि.30 (जिमाका):  31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून खारपाडा ते कशेडी (मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66), माणगांव-ताम्हाणी घाटमार्गे दिघी (रा.मा. क्र. 753-फ), कर्जत-पळसदरी-खोपोली-पालीफाटा- वाकण (रा.मा. क्र. 584-अ), वडखळ-अलिबाग (रा.मा. क्र. 166-अ), चौकफाटा-कर्जत राज्यमार्ग, अलिबाग-मुरुड राज्यमार्ग व अलिबाग-मांडवा या महामार्ग व राज्यमार्गांवरून दि.31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजल्यापासून ते दि.01 जानेवारी 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने दि.31 डिसेंबर 2025 रोजी "थर्टी फस्ट" चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन...