7 डिसेंबर रोजी अलिबाग येथे महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन अलिबाग व मुरुड तालुक्यांतील प्रलंबित अपिलांचा जलदगतीने निपटारा होणार

 

 

रायगड-अलिबाग, दि.20 (जिमाका) : अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात सोमवार, दि07 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून अलिबाग व मुरुड तालुक्यांतील प्रलंबित अपिलांचा जलदगतीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट असून, समेटाने मिटू शकणाऱ्या प्रकरणांमध्ये संबंधित विधिज्ञ व पक्षकारांनी लेखी म्हणणे सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.

उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या न्यायालयातील प्रलंबित अपिले व दाव्यांच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी यांनी 27 ऑगस्ट 2026 रोजीच्या आदेशान्वये या न्यायालयात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ आयोजित करून अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या न्यायालयात ही लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उपविभागातील अलिबाग व मुरुड तालुक्यांतील संबंधित विधिज्ञ आणि पक्षकारांनी या सुनावणीस उपस्थित राहावे. तसेच, समेटाने मिटविता येणाऱ्या प्रकरणांमध्ये आपले लेखी म्हणणे न चुकता सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड