Posts

जिल्हा परिषद कृषि विभाग : औषध फवारणी प्रशिक्षण आयोजन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2:-   येथील पंचायती समिती कार्यालयातील सभागृहात आज जि.प.कृषि विभाग व राज्य शासन कृषि विभाग   यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी जागृती मेळाव्यात औषध फवारणी प्रशिक्षण पार पडले. यावेळी  पंचायत समिती सभापती प्रिया पेढवी, बायर क्रॉपसायन्सच्या मुंबई कंपनीचे सुशिल देसाई , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके,कबन नाईक,माजी जि.प.सदस्य् विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग विकास पाटील, जिल्हा निरिक्षक इंगळे,कृषि विकास अधिकारी दिलीप वर्पे, मोहिम अधिकारी अशोक पवार, गुण   नियंत्रण निरिक्षक सुनिल प्रधान, विस्तार अधिकारी (कृषि)   एस.डी.मारकड,आर.बी.घरत,प्रार्थना भोईर,पं.स.उरण विस्तार अधिकारी (कृषि)प्रतिमा गोरे, पं.स. मुरुड विस्तार अधिकारी (कृषि) राखी खोपकर,धिवरे पं.स.पेण गुणनियंत्रक निरिक्षक एम.एम.भालेराव,विस्तार अधिकारी (कृषि)सौ.पाटील,सावळे,पं.स.महाड कृषी अधिकारी श्री.सरकटे,पं.स.श्रीवर्धन कृषि अधिकारी श्री.कांबळे,विस्तार अधिकारी राधा कराळे तसेच पेण,अलिबाग,मुरुड व उरण येथील शेतकरी व किटक नाशके विक्रेते आदी मोठया संख्येने उपस्थित होत...

संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे : चर्मोद्योग प्रशिक्षण; इच्छुकांकडून अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचेमार्फत चांभार, ढोर,मोची,होलार या सर्व वर्गातील होतकरु तरुणांसाठी फरसतगंज,उत्तर प्रदेश येथे दोन महिन्याचे (डिसेंबर ते जानेवारी ) प्रशिक्षण योजना आयोजित करण्यात आली आहे. या चर्मोद्योग प्रशिक्षण योजना पुढीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे. Certificate Programm in Cutting Operator-Footwear Certificate Programm in Closing Operator-Footwear प्रशिक्षणासाठी अटी व शर्ती : वय-लाभार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्ष असावे.शैक्षणिक पात्रता-लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास असावी., आवश्यक कागदपत्रे - जातीचा दाखला,जन्मतारखेचा दाखला,रेशन कार्ड,फोटो,आधारकार्ड जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांचे   अर्ज वाटप, दाखल करण्याची   तारीख 13 ते 14 नोव्हेंबर प्रत्येक जिल्ह्यात अर्जाची छाननी करण्याची मुदत दि. 16 ते 17 नोव्हेंबर पर्यंत राहील. प्रत्यक्षपणे लाभार्थींची मुलाखत व निवड दि.20 ते 22 नोव्हेंबर पर्यंत आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. असे ...

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा -2018 : अर्ज भरण्यासाठी 25 पर्यंत मुदत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार द्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय या निवासी विद्यालयातील सन 2018 साठी होणारी प्रवेश परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी   साडेअकरा वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियोजीत परीक्षा केंद्रावर होणार आहे.   इयत्ता पाचवी च्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी या परिक्षेसाठी अर्ज करुन शकतात. प्रवेश परिक्षेचे अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया या वर्षापासून ऑनलाईन सोबत ऑफलाईन करण्यात आलेली असून शेवटची मुदत 25 नोव्हेंबर 2017 आहे.         ऑनलाईन व प्रवेश परिक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा-2018 या अभ्यासक्रमाबाबतची माहिती   www.nvshq.org   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन परीक्षा फॉर्म डाऊनलोड करुन घेवून त्यांची प्रिंट घेऊन विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता पाचवी च्या वर्गात शिकत आहे. त्या शाळेत जावून संपूर्ण फॉर्म काटेकोरपणे भरुन त्याच्यावर पालकांची सही घ्यावी व नंतर शाळेच्या मुख्याध्यापकाची सही घे...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना : अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 10 वी, 12 वी, पदवी, पदवीका परीक्षेमध्ये 60 % पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी निवासाची व्यवस्था ही वसतीगृहाच्या संख्येअभावी  होऊ न शकल्यास त्यांना मॅट्रिकोतर शिक्षण घेण्यासाठी भोजन, निवास व अन्य शैक्षणिक सुविधांसाठी थेट विद्यार्थ्याच्या बॅंक खात्यात रक्कम वितरीत करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यास प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आह...

विधानमंडळ विशेषाधिकार समितीची आज अलिबाग येथे बैठक

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- महाराष्ट्र विधानमंडळ विशेषाधिकार समितीची उद्या शुक्रवार दि.3 रोजी रायगड जिल्हास्तरीय  बैठक अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी विधानमंडळातील अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात आढावा घेतला. विधानमंडळ विशेषाधिकार समितीची बैठक शुक्रवार दि.3 रोजी  सकाळी साडेदहा वा. जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीप्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे या राहणार आहेत. यावेळी समिती सदस्य आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, गिरीशचंद्र व्यास, रविंद्र फाटक, रामराव वडकुते, ख्वाजा बेग,ॲड. निरंजन डावखरे,  डॉ. सुधिर तांबे,  सुभाष झांबड, मरनाथ राजुरकर, प्रा. जनार्दन चांदुरकर यांचीही उपस्थिती राहिल.  याबैठकीस जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठकीच्या पुर्वतयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. निवासी उपजिल्हाधिकरी किरण पाणबुडे यांच्यासह  विधानमंडळाचे उपसचिव एन.जी. काळे, अवर सचिव उमेश शिं...

सनदी व प्रमाणित लेखापालांना आवाहन

        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:- वैधानिक लेखापरिक्षण अंती शासनाकडे भरणा केलेले 20   टक्के लेखापरिक्षण शुल्क् संबंधित सनदी, प्रमाणित लेखापरिक्षकांना अदा करण्याचे सुचित केलेले आहे. तरी ठाणे,पालघर व रायगड जिल्ह्यातील संबंधीत सनदी,प्रमाणित लेखापरिक्षक यांनी सहकारी पशु, दुग्ध व मत्स्य संघ संस्थांचे 20   टक्के लेखापरिक्षण शुल्क शासनाकडे भरणा केलेल्या चलनांच्या प्रती व संस्थांची यादी तात्काळ जिल्हा विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था, पदुम ठाणे या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था पदुम, ठाणे गणेश शंकर शिंदे, यांनी केले आहे. 00000

आदिवासी क्षेत्रातील बालकांची आरोग्य तपासणी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:- जिल्हा रुग्णालय अलिबाग व महिला व बाल कल्याण विभाग रा.जि.प. अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने 31 ऑक्टोंबर रोजी पोषण पुनर्वसन केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे कर्जत तालुक्यातील सॅम व मॅम बालकाची आरोग्य तपासणी करण्याकरीता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराकरीता कर्जत तालुक्यातील एकूण 30 सॅम व मॅम बालके महिला व बाल कल्याण विभागा मार्फत उपस्थित ठेवण्यात आली होती. सदर शिबिरामध्ये बालकाची आरोग्य तपासणी सुरु असताना जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, महिला व बाल कल्याण विभाग सभापती उमा मुंडे, आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांनी सॅम व मॅम बालक व त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधला. सदर शिबिरामध्ये उपस्थित बालकाची आरोग्य तपासणी डॉ.परवेझ शेख, बालरोग तज्ञ, जिल्हा रुग्णालय अलिबाग यांनी केली. एकूण 17 पुरुष व 13 महिला, सॅम पुरुष 7 व महिला 6, मॅम पुरुष 7 व महिला 6, नॉर्मल पुरुष 3 व महिला 1 . सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्ह...