Posts

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- विशेष केंद्रीय अर्थ सहाय्य  योजनेअंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थिंकडून दि.24 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले असून दि.28 रोजी प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.   रायगड  जिल्ह्यासाठी  या आर्थिक वर्षाचे प्रशिक्षणाचे उदिष्ट् दोनशे भौतिक व 30.00 लाख आर्थिक असे देण्यात आलेले आहे.   या योजनेअंतर्गत कॉम्प्युटर ट्रेनिंग,ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, मोबाईल रिपेअरींग,ॲटोमोबाईल रिपेअरिंग सेंटर सर्व्हिस, टि.व्ही., रेडिओ, टेपरोकॉर्डर माशिन, फेब्रिकेटर, वेल्डींग वर्कस, ड्रायव्हींग, फ्रीज, ए.सी.रिपेअरिंग, मोटर रिवांडींग, पेंटींग ऑटोमोबाईल या व्यवसायांचे प्रशिक्षण तीन महिने कालावधीसाठी दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना प्रतिमहा एक हजार रुपये  विद्यावेतन देण्यात येणार आहे. इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी अर्ज भरुन दि.24 न...

न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत : स्वसंरक्षण प्रशिक्षण व जनजागृती मेळावा प्रस्ताव मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत सन 2017-18 मध्ये अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना स्वसंरक्षणसाठी ज्युडो, कराटेचे प्रशिक्षण तसेच आदिवासी पाड्यात टि.बी., एडस्,स्तनपान,कुपोषण जनजागृती मेळावा घेण्यासाठी मान्यताप्राप्त सेवाभावी संस्थाकडून प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव दि.27 नोव्हेंबर पर्यंत मागविण्यात आले आहेत. प्रस्तावासाठी  खालील प्रमाणे कागदपत्रे अनिवार्य आहेत- संस्था नोंदणी अधिनियम 1860 व 1950 अन्वये नोंदणीकृत असल्याबाबतचे प्रमाणपत्र व तपशिल.,संस्थेचे मागील तीन वर्षाचे सनदी लेखापाल यांचे लेखापरिक्षण अहवाल.,जाहिरात नमुद केलेली योजना राबविण्याचा दोन वर्षाचा अनुभव राहील.,संस्थेचे पॅनकार्ड,बँकखाते पुस्तक् व आधारकार्डाची प्रत.,संस्थाचालकाचा बायोडाटा व तज्ञमार्गदशकांचा सविस्तर् तपशिल.,मागील तीन वर्षाचा आयकर भरणा प्रमाणपत्र.,संस्थेचा व्यवस्थापन समितीचा तपशिल.,संस्थेचा उत्पनाचा स्त्रोत व बँकेचा तपशिल. तरी  इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प् पेणचे प्रकल्पअधिकारी गजेंद्र केंद्रे, यांनी केले आहे. ...

राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा : पुणे विभाग सर्वसाधारण विजेता, यजमान मुंबई उपविजेता

अलिबाग , जि. रायगड ता . 20 (जिमाका) -   नेहुली संगम येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या शेवटच्या दिवसाअखेर पुणे विभागाने सर्वाधिक 30 सुवर्णपदके, 13 रौप्यपदके व 14 कांस्यपदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पट काव ले. यजमान मुंबई विभागाने 14 सुवर्णपदके, 14 रौप्यपदके व 12 कांस्यपदके मिळवून उपविजेतेपद तर कोल्हापूर विभा ग 11 सुवर्णपदके, 17 रौप्यपदके व 24 कांस्यपदके मिळवीत ति स ऱ्या स्थानावर राहिला. गतवर्षी यजमान मुंबई विभागाचा संघ तिस ऱ्या स्थानावर होता, चालु वर्षी संघातील सर्व खेळा डुं नी आपली कौशल्ये प णा ला लावत संघास उपविजेतेपदाप र्यं त नेले. आजचे निकालः - १७ वर्षाखालील मुले- 73 ते 7 ८ किलो वजनगट  - १ ) वल्लभ जाधव, नाशिक 2) गौरव सिंह, मुंबई 3) सागर काळे, कोल्हापूर व सिध्देश जगताप पुणे . 78 किलोवरील वजनगट - १ ) रोहन तिवारी, मुंबई 2) राज माळी, पुणे 3) मनमित सिंग, औरंगाबाद व अर्नव राणे, नागपूर १७ व र्षाखालील मुली- ४ 9 ते 52 किलो वजनगट  - १ ) निशीता कोतवाल, पुणे 2) मधुरा दरेकर, मुंबई 3) प्रियंका गव्हाणकर, नाग...

जुने शासकीय वाहन विक्री

अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.20- प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या नियंत्रणाखालील शासकीय वाहन क्र एस्टीम व्ही,एक्स-एम एच -01 बीए-5455 निर्लेखित करण्यात आले असून  हे वाहन जास्त किंमत देवून खरेदी करु इच्छिणाऱ्या   लोकांकडून मोहोरबंद किंमतीच्या निविदा यापूर्वी दिनांक 19सप्टेंबर 2017 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागविण्यात आल्या होत्या. परंतू, त्याप्रमाणे एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे सदरहू वाहन जास्त किंमत देवून खरेदी करु इच्छिणाऱ्या लोकांकडून पुन्हा मोहोरबंद किंमतीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक खरेदीदारांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या नावाने  मोहोरबंद किमतीच्या निविदा 18 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात पोहचतील या बेताने सादर कराव्यात. निविदा दि. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात उघडण्यात येतील, असे मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,रायगड अलिबाग यांनी कळविले आहे. ०००००

जलयुक्त शिवार अभियान : पत्रकार पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका): जलयुक्त शिवार अभियानात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत वस्तुनिष्ठ प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांकडून 27 नोव्हेंबर 2017 पर्यंत पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकारांसाठी दोन स्वतंत्र गटात स्पर्धा होईल. अभियानाच्या अनुषंगाने स्वत:च्या उत्कृष्ट लिखाणाद्वारे वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकारांची उत्कृष्ट वृत्तचित्रकथा पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येईल. वृत्तपत्रातून जलसंधारणाचे महत्व सर्वांपर्यत पोहोचविणे आणि जलयुक्त शिवार अभियानाची त्या-त्या परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहन देऊन पाणी प्रश्न सोडविण्यास मदत करणाऱ्या पत्रकारा...

प्रधानमंत्री पीक विमा योजनाः रब्बी हंगाम 2017-18 :सहभागासाठी 1 जानेवारी 2018 पर्यंत मुदत

अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका)- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि.1 जानेवारी, 2018 अशी आहे.  तथापि सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी या अधिसुचित पिकाकरिता दि.30 नोव्हेंबर, 2017  अशी मुदत देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचे विमा अर्ज  बँक व ' आपले सरकार सेवा केंद्र ' (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत स्विकारण्यात येतील. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. 01 जानेवारी, 2018 पुर्वीच नजिकच्या बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत.  अधिक माहितीसाठी आपल्या भागातील विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, “ आपले सरकार सेवा केंद्र ” (डिजीटल सेवा केंद्र)  यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषि मंत्री ना. पांडुरंग फुंडकर, यांनी केले आहे....

ग्रंथोत्सव 2017:बुधवारपासून ग्रंथोत्सव, विविध कार्यक्रमांची रेलचेल

अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका)- रायगड जिल्ह्याचा शासकीय ग्रंथोत्सव बुधवार दि.22 व   गुरुवार 23 नोव्हेंबर या दोन दिवसांत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत वाचकांसाठी विविध मान्यवर प्रकाशकांची पुस्तक दालने, मान्यवरांशी चर्चा, परिसंवाद, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा , काव्य मैफिल अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   उद्घाटन सोहळ्यास नामांकीत कवी अशोक नायगावकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रमही रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथप्रेमी वाचक व विद्यार्थ्यांनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सदर दोन दिवसीय कार्यक्रम जेएसएम महाविद्यालय. अलिबाग येथील सभागृहात होणार असून कार्यक्रमांचे वेळापत्रक या प्रमाणे आहे. ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी  बुधवार दि.22 रोजी जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ करण्याआधी कान्होजी आंग्रे समाधिपासून सकाळी 9...