Posts

अखाद्य बर्फ निळा रंग टाकणे बंधनकारक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5-   खाद्य आणि अखाद्य बर्फ ओळखता यावा यासाठी अखाद्य बर्फ उत्पादकांना आता अखाद्य बर्फ तयार करतांना त्यात निळा खाद्यरंग टाकावा व खाद्य बर्फात कोणताही रंग टाकू नये असे आदेश   अन्न सुरक्षा आयुक्त मुंबई यांनी निर्गमित केले आहेत. तसेच खाद्य बर्फाचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना अन्न सुरक्षा व मानके नियमन (परवाना व नोंदणी) 2011 अंतर्गत परवाना घेणे व नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात   सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन पेण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अन्न व्यावसायिकांकडून ग्राहकांना अन्न् पदार्थ विक्री करतांना त्यात वापरण्याचे बर्फ किंवा थेट पाण्यासाठी विक्री होत असलेला बर्फ पिण्यायोग्य पाण्यापासून तयार केलेला नसल्याने त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परीणाम होत असतात ही बाब निदर्शनास आल्यामुळे खाद्य बर्फ व अखाद्य बर्फ ओळखता यावे, याकरीता श्रीमती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दि. 31 मार्च रोजी अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात बर्फाचे उत्पादन करतांना अखाद्य बर्फात निळा खाद्यरंग टाकावा व ...

ब्रेक चाचणी पथाचा लोकार्पण सोहळा रविवारी

अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.5- प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या मौजे तळोजे मजकूर,ता.पनवेल येथील शासकीय जागेत सीएसआर फंडातून तयार करण्यात आलेल्या ब्रेक चाचणी पथाचा लोकार्पण सोहळा रविवार दि.8 रोजी रोजी सकाळी दहा वा. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत व    परिवहन,खारभूमी विकास ना.दिवाकर रावते यांच्या शुभ हस्ते   होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान,अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा   पालकमंत्री   रायगड ना.रविंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील, आ. अनिल तटकरे, आ. सुनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे,आ.बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य आ.प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. मनोहर भोईर, आ. सुरेश लाड, आ.धैर्यशील पाटील, आ. सुभाष पाटील, आ. अवधुत तटकरे हे मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.या कार्यक्रमास परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक (भा.प्र....

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.5- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे 7 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शनिवार दि.7 रोजी सकाळी अकरा वा.पेण ता.पेण जि.रायगड प्रयाण. दुपारी तीन वाजता पेण येथे आगमन.सायंकाळी सात वाजता पेण जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण. ०००००

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 21 रोजी परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5:- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी शनिवार दि.21 रोजी होणार असून या परीक्षेचे प्रवेशपत्र हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे प्रवेश पत्र चाचणी पात्र परीक्षार्थिंनी (ऑनलाईन) सी.एस.सी. सेंटर मधून डाऊनलोड करावे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑफ लाईन अर्ज भरलेले आहेत त्यांनी आपण शिकत असलेल्या शाळेतून अर्ज घ्यावेत. ऑफलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत गटातील सर्व शाळांना उपलब्ध करुन दिले जातील. विद्यार्थ्यांनी   परिक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे. या बाबत काही अडचणी असल्यास   सकाळी नऊ ते सायं. साडेपाच वा.पर्यंत (शनिवार, रविवार या दिवशी सुद्धा) विभागीय पातळीवर 8208331382 व 9325416896 व विद्यालय पातळीवर   9420650395 व 7709962313 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी, पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर जि. रायगड यांनी केले आहे. ०००००

अनु.जाती-जमाती, भटक्या जमाती,अपंग विद्यार्थ्यांसाठी जावळी ता. माणगाव निवासी शाळेत मोफत शिक्षण सुविधा

अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.3:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जावळी ता.माणगांव जि. रायगड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून इयत्ता सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश   प्रक्रिया सुरु झाली असून मोफत प्रवेश दिला जात आहे. शासकीय निवासी शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेश   आरक्षण पुढीलप्रमाणे- अनुसूचित जाती-80 टक्के, अनुसूचित जमाती-10 टक्के,अपंग प्रवर्ग-3 टक्के, विमुक्त् जाती व भटक्या जमाती-5 टक्के, तर विशेष मागास प्रवर्ग-2 टक्के शासकीय निवासी शाळेची वैशिष्ट्ये -शाळा विभाग व निवासाकरता स्वतंत्र इमारती,शासनामार्फत राहण्याची व जेवण्याची विनामूल्य सोय,शासनामार्फत मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, निवासी साहित्य, सुसज्ज ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, खेळाचे भव्य मैदान व क्रीडा साहित्य अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्र पुढील प्रमाणे- विद्यार्थ्यांचा ज...