Posts

राष्ट्रीय लोकअदालतीचे यश : दाखलपुर्व प्रकरणात 103 कोटी तर प्रलंबित प्रकरणात 16 कोटी रुपयांची वसूली

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित राष्ट्रीय लोक अदालत उपक्रम रविवार दि.22 रोजी राबविण्यात आला. यावेळी रायगड जिल्ह्यात  न्यायालयातील प्रलंबित 2353 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 16 कोटी 24 लाख 97 हजार 853 रुपये तर दाखलपुर्व 50326 प्रकरणांमध्ये  तडजोड होऊन 103 कोटी 60 लाख 99 हजार 897 रुपये इतक्या रकमेची वसूली करण्यात आली.  या लोकअदालतीचे उद्घाटन  जिल्हा न्यायाधीश -1 के. आर. पेठकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी  उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा सरकारी वकील संतोष पवार, वकील संघटनेचे सचिव ए.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा विधी एवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर  हेमा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वृषाली पाटील तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी केले.  या लोकअदालतीत प्रलंबित भूसंपादनाच्या 104 प्रकरणात तडजोड होऊन 11 कोटी रुपये, मोटार अपघात दाव्यांच्या 46 प्रकरणात तडजोड होऊन 33 कोटी 54 लाख 4 हजार 79...

माथेरान सनियंत्रण समितीची गुरुवारी बैठक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24- भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार रायगड व ठाणे  जिल्ह्यातील एकूण 89 गावांचा (काही पूर्ण व काही भागत:) प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार सनियंत्रण समितीही गठित करण्यात आली आहे. या संवेदनशील क्षेत्रातील कोणतीही विकास कामे सनियंत्रण समितीच्या मान्यतेने करावयाची असतात. यासंदर्भात माथेरान सनियंत्रण समितीची सातवी बैठक गुरुवार दि. 3 मे रोजी  दुपारी साडेतीन वा. राजस्व सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी संवेदनशील क्षेत्रातील विकास कामांचे प्रस्ताव दहा प्रतित समितीच्या मान्यतेसाठी किमान पाच दिवस आधी सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे. ०००००

शुक्रवारी महाड येथे विरपत्नी मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24:-   भारतीय सैन्यदलात किंवा सशस्त्र दलात असणाऱ्या  आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणाऱ्या अधिकारी जवानास कोणत्याही युद्धात किंवा युद्धजन्य् परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कारवाईत वीरमरण आलेले जवान अथवा अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास जमीन प्रदान करणेसाठी महाराष्ट्र शासनाने, जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे)(सुधारणा) नियम 2018 मध्ये सुधारणा करणेबाबत तसेच त्याबाबत मार्गदर्शन करण्याकरीता शुक्रवार दि.27 रोजी सकाळी  10  वा. सैनिक मुलांचे वसतिगृह, नवे नगर, महाड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात  येणार आहे. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व युद्धविधवा व कायदेशीर वारसांनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या मागण्या लेखी स्वरुपात द्याव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी केले आहे. ०००००

शेताच्या बांधावर लागणार वृक्ष आणि मिळणार रोजगारही

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.24:-   महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मग्रारोहयो) शेतकऱ्यांच्या शेतावर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड होणार असून या रोपांची देखभाल संगोपन केल्याबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलाही दिला जाणार आहे. वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचे संवर्धन साधतांना ग्रामिण भागातील अल्पभूधारक, शेतकऱ्यांना, शेतमजूरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने ही योजना नुकतीच 12 एप्रिल रोजी शासन निर्णय जारी करुन लागू केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही योजना राबविली जाणार आहे. मग्रारोहयोजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेताच्या बांधावर किंवा शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर  ही वृक्ष लागवड होणार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची योजना आहे. या आधी  कृषि व पदुम विभागांमार्फत अशाप्रकारे मान्यता देण्यात आली होती. आता सामाजिक वनीकरण विभागामार्फतही अशाप्रकारे वृक्ष लागवड करता येणार आहे.  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी,  स्त्री कर्ता असलेली कुटूंबे, शारिरीकदृष्ट्या विक...

प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन: 30 एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23:-   प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती गावनिहाय संकलित केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांची संकलित याद्यांचे वाचन करण्यासाठी सोमवार दि.30 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड- अलिबाग यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम रविवार दि.15 एप्रिल पासून सुरु झाली असून ती सोमवार दि.21 मे पर्यंत   जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट् असलेल्या प्रत्येक कुटूंबात प्रतिवर्षी रु. पाच लाख इतके आरोग्य विमा संरक्षण   दिले जाणार आहे.   यासाठी सोमवार दि.30 एप्रिल रोजी ग्रामसभेमध्ये लाभार्थी याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यासाठी लाभार्थ्यांची खालील बाबींवरील माहिती घेणे आवश्यक आहे.मोबाईल क्रमांक, शिधा पत्रिका क्रमांक, कुटूंबाच्या सद्यस्थितीमधील बदल. तसेच या ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटूंबाची माहिती...

एमएचटी सीईटी -2018 ची सामाईक प्रवेश परिक्षा 10 मे रोजी; जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची यादी जाहीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23-   सक्षम प्राधिकारी व संचालक,सीईटी कक्ष, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी -2018 ची सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवार दि. 10 मे रोजी होणार आहे. ही परीक्षा रायगड जिल्ह्यातील ज्या 20 परीक्षा केंद्रांवर होणार आहे त्या केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. ती याप्रमाणे- 1 .जा.र.ह.कन्याशाळा व कनिष्ठ् महाविद्यालय,अलिबाग, 2.को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, अलिबाग, 3.जे.एस.एम.कॉलेज,अलिबाग, 4.ॲड. दत्ता पाटील लॉ.कॉलेज अलिबाग, 5.चिंतामणराव केळकर विद्यालय,रेवदंडा बायपास रोड,अलिबाग जि.रायगड, 6.सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल चेंढरे, अलिबाग, 7.आर.सी.एफ. सेकंडरी व हायर सेकंडरी विद्यालय कुरुळ अलिबाग, 8.पी.एन.पी. आर्ट, कॉमर्स आणि सायन्स् कॉलेज, वेश्वी अलिबाग, 9.पी.एन.पी. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, वेश्वी, अलिबाग, 10. श्री.स.म...

'पाण्याच्या पेरणी'साठी कापडे बु॥ येथे श्रमदान

Image
             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- 'जे पेराल ते उगवेल',असे आपण नेहमी म्हणतो. हे पाण्याच्या बाबतीतही तितकेच खरंआहे. भविष्यात पाणी वापरायला मिळावं त्यासाठी ते पावसाच्या स्वरुपात पडतं तेव्हा ते पेरावं लागतं. म्हणजे मग नंतर आपल्याला जमिनीत साठवलेल्या पाण्याचं पिक मिळतं. हा विचार कापडे बु॥ ता. पोलादपुर या ग्रामस्थांनी केला. आणि पाणी पेरण्यासाठी म्हणून सगळ्यांनी श्रमदान करुन पाऊसरुपी पाण्याची पेरणी करण्यासाठी सलग समतल चर खोदले. त्यांना पाठबळ देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी सपत्निक उपस्थित होते. सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, उद्योगक्षेत्रातील कर्मचारी या ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून रविवारी (दि.22)श्रमदान करतांना दिसले.   पोलादपूर तालुक्यातील कापडे बु॥ हे गाव सध्या पाणीटंचाईचा सामना करतंय. आणि हेच गाव पावसाळ्यात अतिवृष्टीचाही सामना करतं. या दोन विषम परिस्थिती सांधण्यासाठी आज या गावाच्या शिवारात     सलग समलत चर खोदण्यात आले. पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित प्री वॉटरकप स्पर्धेत या गावाचा ...