Posts

रंग दे महाराष्ट्र द्वारे रंगल्या शाळांच्या भिंती: सामाजिक एकोपा हीच परिवर्तनाची गुरुकिल्ली- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.28:- जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करु शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज मुठवली ता. माणगाव येथे केले.यावेळी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. या अभियानांतर्गत निवडलेल्या निवडक गावातील कामांची पाहणी करुन ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने आज केली. त्या अंतर्गत आज सकाळी मुठवली या गावी आज सकाळी ग्रामस्थांशी सर्व अधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,प्रांताधिकारी देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार तसेच ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरुष मोठ्...

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.28- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड हे सोमवार दि.30 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे- सोमवार   दि.30 रोजी   रात्री साडे नऊ वा.शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव. मंगळवार दि.1 मे रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिन उत्सवानिमित्त राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभास उपस्थिती.स्थळ: पोलीस परेड ग्राउंड, अलिबाग. सकाळी सव्वा नऊ वा,. अलिबाग जि. रायगड येथून मोटारीने पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. ०००००

कामगार मंत्री ना.संभाजी पाटील निलंगेकर यांचा जिल्हा दौरा

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.28- कौशल्य् विकास व उद्योजकता,कामगार,भूकंप पुनर्वसन मंत्री ना. संभाजी पाटील निलंगेकर हे रविवार दि.29 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे- रविवार दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल जि.रायगड येथे आगमन. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे 22 वे त्रैवार्षिक अधिवेशनास उपस्थिती.स्थळ: सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल.दुपारी बारा वाजता सी.के.टी पनवेल हायस्कुल, पनवेल येथून मुंबईकडे प्रयाण. ०००००

अनधिकृत शाळांची यादी जाहीर

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.27:- शासनाच्या परवानगी शिवाय रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी अनधिकृत शाळा सुरु आहेत. अशा अनधिकृत शाळा शैक्षणिक वर्ष 2017-18 या मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय संबंधित संस्थांनी सुरु करु नयेत. अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी RTE-2009 च्या कायद्याप्रमाणे व याबाबतच्या महाराष्ट्र शासन नियमावली 2011 नुसार उचित कार्यवाही करावी. पालकांनी आपल्या पाल्यांस अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे प्रवेश घेवू नये. अन्यथा अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान   झाल्यास त्यास पालकच जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, यांनी केले आहे. शिक्षण विभागाने दिलेली जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी याप्रमाणे- अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणे- पाली- रुता गावंड संस्था लिटील वंडर्स स्कूल परळी, रोहा-1) रायगड एज्युकेशन सोसा.इग्लिश मिडियम स्...

क्रीडा नैपुण्य चाचणी कार्यक्रम जाहीर

            अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत संपुर्ण राज्यात शारिरीक शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचविण्यासाठी आणि राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी वैज्ञानिक पद्धती , अद्यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्याची गरज आहे . या उद्देशाने राज्यातील खेळ , परंपरा , अंत : सामर्थ्य व खेळ सुविधा लक्षात घेऊन राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि इंग्लिश मिडीयम शालेय शिक्षणासह बालेवाडी , पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्थापना केली आहे .             शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यात विविध ठिकाणी क्रीडा प्रबोधीनी सुरू आहेत . या क्रीडा प्रबोधीनीमध्ये  ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला - मुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्ट द्वारे निवड करून त्यांना विविध खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या म...

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2018 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या निवडणूकीसाठी स्थानिक मतदारांची  कार्यक्रम पुढीलप्रमाणे- अधिसूचना जारी करणे दि.26 एप्रिल, नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिनांनक गुरुवार दि.3 मे, दाखल उमेदवारी अर्जांची छाननी 4मे , अर्ज माघारीचा अंतिम दिनांक 7 मे, मतदान दिनांक 21 मे, मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी चार वा. निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याचा दिनांक 29 मे 2018. ०००००

मे महिन्यात लोकशाही दिन नाही

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.26- रायगड जिल्ह्यात विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंध द्विवार्षिक निवडणूक-2018भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या दिनांकापासून निवडणूकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत दि.(20 एप्रिल ते 29 मे 2018) पर्यंत आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मे -2018 मधील दिनांक सोमवार दि.7 मे रोजीचा लोकशाही दिन रद्द् करण्यात आला आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड यांनी कळविले. ०००००