Posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र वार्षिकी 2018' संदर्भग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध

Image
           अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-   माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ज्ञान व माहितीचा खजिना असलेला संदर्भग्रंथ नवीन आकर्षक स्वरुपात वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. या संदर्भग्रंथात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदि घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे. या वार्षिकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दूरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधित गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेशही यात केला आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, आजवरचे विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य यांची यादी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्...

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 -   राज्याचे   महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना. चंद्रकांत पाटील हे रविवार दि. 20 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि.20 रोजी सायं.पाच वा. एमटीडीसी विश्रामगृह,माथेरान, जि. रायगड येथे आगमन, राखीव व मुक्काम, सोमवार दि.21 रोजी एमटीडीसी विश्रामगृह, माथेरान, जि. रायगड येथे राखीव व मुक्काम.   मंगळवार दि.22 रोजी सकाळी सात वाजता माथेरान, जि. रायगड येथून वाहनाने मुंबईकडे प्रयाण. ०००००

शस्त्र बाळगण्यास मनाई

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्राच्या हद्दीत (नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) पोलादपूर, उरण, श्रीवर्धन , कर्जत, खालापूर, महाड,अलिबाग, सुधागड, मुरुड, म्हसळा, पेण, रोहा, पनवेल,तळा,माणगांव या तालुक्यांमध्ये   महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींसाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.   निवडणूका शांततेत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडण्यासाठी   सोमवार दि.28 पर्यंत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात   शस्त्र परवाना धारकांना त्यांची शस्त्रे ग्रामपंचायत क्षेत्रात आणण्यास तसेच जवळ बाळगण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हा आदेश सेवेवरील पोलीस अधिकारी,कर्मचारी,बँकेचे सुरक्षा अधिकारी,कर्मचारी आणि ज्यांना शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून शस्त्राचा वापर अनुज्ञेय आहे,अशा व्यक्तींना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 188 अन्वये कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी ...

शोध बचाव पथकांना प्रशिक्षण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 -शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती निर्माण   झालेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव व मदत कार्य हाताळण्यासाठी मान्सून -2018 पूर्वतयारी अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय   शोध व बचाव पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण 486 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांतर्गत खालापूर व कर्जत येथे तयार करण्यात आलेल्या पथकांना शुक्रवार दि.19 रोजी   खालापुर येथे सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत प्रशिक्षित केले जाणार आहे. आतापर्यंत पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन याठिकाणी प्रशिक्षणे आटोपली आहेत. या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षक एम.के.म्हात्रे सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, उरण व सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल भोईर यांनी प्रशिक्षण दिले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली आहे. ०००००

केंद्रीय मंत्री के.जे.अल्फॉस यांचा जिल्हादौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - केंद्रीय पर्यटन,इलेक्ट्रॉनिक व आयटी मंत्री के.जे.अल्फॉस हे शनिवार दि.19 रोजी   जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शनिवार दि.19 रोजी सकाळी साडे आठ वा. मांडवा जेट्टी येथे बोटीने आगमन.   8 वा. 40 मि. मांडवा जेट्टी येथून रायगड किल्ला   येथे भेट.   दुपारी तीन वा.रायगड किल्ला येथून जसदनवाला बंगल्याकडे प्रयाण. सायं.पाच वा.जसदनवाला बंगला येथे आगमन. सायंकाळी साडे पाच वा.जसदनवाला बंगला येथून   गेट वे ऑफ इंडिया जेट्टीकडे   प्रयाण. ०००००

किटकनाशक हाताळणीः'आत्मा'तर्फे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18 - शासनाचा कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्र, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.17) 'किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर' याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी   कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, रोहाचे शास्त्रज्ञ डॉ. जिवन आरेकर यांनी किटकनाशक, बुरशीनाशक यांचे प्रकार, त्यांचा सुरक्षित हाताळणी व वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक मंगेश डावरे यांनी किटकनाशकांचा कमीत कमी वापर करुन पिकांचे संरक्षण जैविक पध्दतीने करुन सेंद्रीय शेती करणेबाबत र्मादर्शन केले. तसेच आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे यांनी किटकनाशक वापरण्याच्या पध्दती, किटकनाशकांचा शरीरावर होणारा परिणाम व विषबाधा झाल्यानंतर करावयाच्या प्राथमिक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात शेतकरी मित्र संतोष दिवकर यांनी फवारणी करतांना वापरावयाचे किटचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक मंगेश डावरे, प्रकल्प उपसंचालक डी. एस. चव्हाण,...

वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-   वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्राची वैधता संपण्याआधी किमान 15 दिवस आधी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्याशी संपर्क साधून आपल्या वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सादर करुन ती रितसर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईटमेंट घेऊन वाहन   तपासणी साठी मौजे जिते, ता.पेण, जि.रायगड येथे हजर करावे. अन्यथा मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, जि.रायगड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000