Posts

पाऊस असल्यास ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ बंद

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10 : मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.28/2013 च्या सुनावणी दरम्यान दिलेल्या निर्देशानुसार योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज मौजे जिते ता.पेण येथील वाहन ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर करण्यात येत आहे.     तथापि, जास्त पाऊस असेल तर वाहन ब्रेक टेस्ट ट्रॅक बंद करण्यात येईल, असे   उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे. पाऊस थांबल्यावर ट्रॅक पुन्हा चालू करण्यात येईल.    तरी वाहनधारकांनी आपली वाहने पावसाच्या अंदाजानुसारच ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’वर आणावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे. 00000

रासायनिक खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी

             अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10 : राज्यात कृषि निविष्ठा गुणवत्त्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष   कार्यान्वित असुन सदर कामासाठी राज्यात 1131 खते, बियाणे, किटकनाशके निरक्षकांची नेमणुक केली आहे. सद्यास्थितीत   खरिप हंगामास सुरुवात झाली असुन पिकासाठी रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रातून व केंद्र व राज्य शासनाने मंजुर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस   प्राधान्य   द्यावे   कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्री होत असलेल्या   ठिकाणाहुन जसे दुरध्वनीवरुन संपर्क साधुन विक्री करणारे विक्रते, शेतकऱ्यांना घरपोच खत देणारे अनधिकृत विक्रते यांचेकडुन खरेदी   करु नये.   खरेदी केलेल्या   खताची रितसर पावती घेण्यात यावी व ती पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावी खतात भेसऴ असल्याची   शंका दुर करण्यासाटी खतांची पाकिटे व गोणी सिलबंद असल्याची खात्री   करावी.          केंद्र, राज्य शासनान...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 123.90 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10 -   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 123.90 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1623.72 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 104.00 मि.मि., पेण-80.00 मि.मि., मुरुड-76.00 मि.मि., पनवेल-180.20 मि.मि., उरण-188.00 मि.मि., कर्जत-141.40 मि.मि., खालापूर-118.00 मि.मि., माणगांव-183.00 मि.मि., रोहा-195.00 मि.मि., सुधागड-87.00 मि.मि., तळा-145.00 मि.मि., महाड-186.00 मि.मि., पोलादपूर-81.00 म्हसळा-61.80 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-144.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1982.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 123.90 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   51.67   टक्के इतकी आहे. अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभाग यांच्या वेधशाळेकडून   जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार, येत्या 14 तारखेपर्य...

विकासकामांबाबत नियोजन करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10 -   विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावयाच्या विकास कामांसाठी तांत्रिक मान्यता प्राप्त करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.   जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या कामांचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घेतला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्ह आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,   तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्याचा सन 2018-19 यावर्षीचा 189 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर आहे. सर्व विभागांनी या आर्थिक वर्षात राबवावयाच्या योजनांचे प्रस्ताव आपल्या विभागाकडे पाठवून त्वरीत तांत्रिक मान्यता घ्याव्यात व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात. जेणेकरुन लवकर प्रशासकीय मान्यतेची कारवाई करता येईल. आता कामे करुन घेण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असून अधिकाऱ्यांनी वेळेचे नियोजन करुन कामे करावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 00000

‘तुम्ही पिक कर्ज घेण्यास पुन्हा पात्र आहात’ : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे घरपोच पत्र

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10 -   शासनाने शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत   शेतकऱ्यांना कर्जमाफी, प्रोत्साहनपर लाभ आणि एकवेळ समझोता संधी असे लाभ दिले आहेत. त्यामुळे यंदा पिक कर्ज घेण्यासाठी अनेक शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ‘तुम्ही पिककर्ज घेण्यास   पात्र आहात’,   तरी शेतकऱ्यांनी पिक कर्ज घ्यावे, असे आवाहन करणारे पत्र जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः जिल्ह्यातील सर्व कर्जमुक्त शेतकऱ्यांना पाठविले आहे.   शासनाने सन 20112-13 ते सन 2015-16 या चार वर्षातील   दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे पिक कर्ज न फेडू शकलेल्या शेतकऱ्यांना 28 जून 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करुन कर्जमाफी दिली. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत   एकूण 18 हजार 73 शेतकऱ्यांना 41 कोटी 7 लाख 26 हजार 657 रुपये कर्जाची माफी देण्यात आली आहे. त्यामुळे हे शेतकरी सुद्धा कृषि कर्जाचा लाभ घेण्यास पात्र झाले आहेत. या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेण्यासाठी आपापल्या नजिकच्या विविध...

स्वच्छता अभियानात स्वच्छाग्रहींची भूमिका महत्त्वाची- श्रीमती वसुधा कौल

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.9 (जिमाका)- रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाचे काम अत्यंत प्रभावीपणे सुरु आहे. गावे हागणदारी मुक्त झाली आहेत. तथापि ‘शाश्वत स्वच्छता व मैलागाळ व्यवस्थापन,शौचालयांची देखभाल दुरुस्ती, सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन,किशोरवयीन मुलींसाठी व महिलांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन’ अशा बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छाग्रहींची भुमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे,असे प्रतिपादन पेयजल व स्वच्छता मंत्रालय, नवी दिल्लीच्या सल्लागार श्रीमती वसुधा कौल यांनी केले. आपल्या दौऱ्यात श्रीमती कौल यांनी पनवेल तालुक्यातील चावणे व खालापुर तालुक्यातील माडप व लोधिवली ग्रामपंचायतला त्यांनी भेटी दिल्या व ग्रामसेवक व स्वच्छाग्रहीशी संवाद साधला.             जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी रायगड जिल्हयाचे स्वच्छता स्थितीबाबत व स्वच्छता अभियानाच्या प्रगतीचे शाश्वत स्वच्छतेबाबतच्या उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील, मुल्यमापन व संनियंत्रण सल्लागार सुनील माळी आदी उपस्थित होते. स्वच्छ...

नाव्हे येथे पुरात अडकलेल्या दोघांची सुखरुप सुटका

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.9 (जिमाका)- भात लावणीच्या कामासाठी शेतात गेलेले दोघे जण पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. नाव्हे ता. रोहा येथे रविवारी (दि.8) ही घटना घडली. आपत्ती निवारण कक्षाच्या जीवरक्षक पथकाने प्रयत्नांची शर्थ करुन आज (दि.9) पहाटे पाच वाजता या दोघांची पुराच्या वेढ्यातून सुखरुप सुटका केली. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून रविवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत होता. नाव्हे येथील भिकाजी गोविंद डबीर आणि किशोर भिकाजी डबीर   हे दोघे आपल्या शेतात भात लावणीच्या कामासाठी गेले होते. दरम्यान आलेल्या पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे त्यांचे शेत पाण्याने वेढले गेले. डबीर यांचे शेत हे दोन नदीच्या पात्रांजवळ आहे. शेतात भात लावणी करीत असताना नदीचे पाणी अचानक वाढले. या वाढलेल्या पाण्यात डबीर पितापुत्र अडकले. पाण्याचा वाढता जोर पाहून दोघेही शेतातच सुरक्षित ठिकाणी थांबले होते. हे दोघे अडकल्या बद्दल कुणालाच माहिती नव्हती.   रात्री अडीच वाजता मुंबई येथे असणाऱ्या त्यांच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोन करून या घटनेची माहिती दिली. जि...