Posts

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

               अलिबाग,जि. रायगड, दि.30,(जिमाका)- जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत मंगळवार दि.6 नोव्हेंबर 2018 पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे. 00000

राष्ट्रीय एकता दौड; आबालवृद्धांचा सहभाग

Image
               अलिबाग,जि. रायगड, दि.30,(जिमाका)- सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित राष्ट्रीय एकता दौड 2018 मध्ये अलिबाग शहर व परिसरातील आबालवृद्ध धावपटूंनी सहभाग घेतला व दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरदार वल्लभाई पटेल यां च्या जयंती निमित्ताने जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात मॅरोथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अलिबाग समुद्र किना ऱ्या वर प्रथम सर्वाना एकात्मतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर आलिबाग समुद्रकिना ऱ्या वरून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर , पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर आदिंनी झेंडा दाख वून रॅलीस मार्गस्थ केले. यात पुरुष, महिला, जेष्ठ नागरिक, आर.एस.पी.विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. सदर एकता दौड 5 किलोमीटरची अंतराची होती व त्यात प्रत्येक गटातील प्रथम तीन   विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व मेडल देवून गौरवण्यात आले. राष्ट्रीय एकता दौडला अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गु...

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

                अलिबाग,जि. रायगड, दि.30,(जिमाका)- जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत मंगळवार दि.6 नोव्हेंबर 2018 पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकता दौड; आबालवृद्धांचा सहभाग जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन व एकात्मता शपथ

Image
                अलिबाग,जि. रायगड, दि.30,(जिमाका)- सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित राष्ट्रीय एकता दौड 2018 मध्ये अलिबाग शहर व परिसरातील आबालवृद्ध धावपटूंनी सहभाग घेतला व दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरदार वल्लभाई पटेल यां च्या जयंती निमित्ताने जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात मॅरोथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अलिबाग समुद्र किना ऱ्या वर प्रथम सर्वाना एकात्मतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर आलिबाग समुद्रकिना ऱ्या वरून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर , पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर आदिंनी झेंडा दाख वून रॅलीस मार्गस्थ केले. यात पुरुष, महिला, जेष्ठ नागरिक, आर.एस.पी.विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. सदर एकता दौड 5 किलोमीटरची अंतराची होती व त्यात प्रत्येक गटातील प्रथम तीन   विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व मेडल देवून गौरवण्यात आले. राष्ट्रीय एकता दौडला अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ...

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे बुधवार दि.31 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- बुधवार दि. 31 रोजी सायं.सहा वा. महाड एमआयडीसी येथे आगमन. गुरुवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी   पावणे दहा वा. महाड, एमआयडीसी येथून महाड शहराकडे प्रयाण.   सकाळी 10 वा. महाड शहर जि. रायगड येथे आगमन. दुपारी तीन वा. महाड येथून मुंबईकडे प्रयाण.

जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यात सवलती लागू

अलिबाग,जि. रायगड, दि.30,(जिमाका)-  राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती  जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन हे तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने उपाययोजना व सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,   राज्यातील सन 2018-19 च्या खरीप हंगामातील पाहणी निकषांनंतर लागू झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, श्रीवर्धन या तीन तालुक्यांत   शासनाने दि.23 ऑक्टोबर रोजी शासन निर्णयाद्वारे दुष्काळ सदृष्य परिस्थिती   जाहीर केली आहे. त्यानुसार या तीन तालुक्यात जमीन महसूल सूट,   सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीत स्थगिती,   कृषीपंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर,   टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या ...

इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षाः खाजगी विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होण्यासाठी विलंब शुल्कासह मुदतवाढ

अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं.17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रकटनानुसार, फेब्रुवारी –मार्च 2019 मध्ये होऊ घातलेल्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांसाठी  फॉर्म नं.17 ऑनलाईन भरुन  प्रविष्ठ होण्याची मुदत संपली आहे. त्थापि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विलंब व अतिविलंब शुल्क भरुन  ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या याप्रमाणे- इयत्ता 10 वी शंभर रुपये विलंब शुल्कासह शुक्रवार दि.26 ऑक्टोबर ते मंगळवार दि.6 नोव्हेंबर. इयत्ता 12 वी 25 रुपये विलंब शुल्कासह शुक्रवार दि.26 ऑक्टोबर ते मंगळवार दि.6 नोव्हेंबर. तर अतिविलंब शुक्ल   प्रतिविद्यार्थी 20 रुपये भरुन बुधवार दि.7 ते बुधवार दि.14 नोव्हेंबर. असे ...