राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा-2018 पुणे विभाग आघाडीवर, मुंबई दुसऱ्या तर कोल्हापूर तृतीय क्रमांकावर
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12- जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबई विभागाच्या अदनान मुक्री, जमशेद लाजीम, अमर जाधव या तीघानीही सुवर्णपदकाची कमाई केली. संकुलात दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत तीनही खेळाडूंनी मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करत अजिंक्यपद पटकाविले. तसेच मुंबई विभागातील रितेश गोवारी, जिवा सेल्वा कुमार, प्रफल्ल् मोटे, कमल किर्ती, अनिरुध्द खरात, प्रणव सावंत, वैभव कांबळे, शाहिद खान, प्रतिक सुर्यवंशी, अभय कहार, संस्कार यादव या 11 खेळाडूंनी रौप्यपदकाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या स्पर्धेमध्ये पुणे विभाग 17 सुवर्णपदके, 8 रौप्य व 4 कांस्य पदकांसह आघाडीवर राहिला. मुंबई विभाग 7 सुवर्ण पदके, 15 रौप्य व 2 कांस्य पदकांसह द्वितीय तर कोल्हापूर विभाग 4 सुवर्णपदके, 1 रौप्य व 6 कांस्य पदकांसह तृतीय स्थानावर आहे. उद्या होणाऱ्या मुलींच्या गटातील स्पर्धेनंतर कोणता विभाग अजिंक्यपद पटकावितो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आजचे निकाल 14 वर्षाखालील मुल...