Posts

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यात रविवारी (19 जानेवारी) रोजी लसीकरण----निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे

अलिबाग, जि. रायगड, दि.07 (जिमाका) -   राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दि.19 रोजी    जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून सदर बुथवर या दिवशी सकाळी   8.00 ते सायं.5.00 या वेळात   0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आज येथे दिली. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स   उपस्थित होते.   यावेळी   निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी यंत्रणानिहाय पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी माहिती देण्यात आली की,   जिल्ह्यातील   ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 88 हजार 850 त्याकरिता ग्रामीण भागात 2 हज...

नारी शक्ती पुरस्कारासाठी मागविले अर्ज

अलिबाग, जि. रायगड, दि.04 (जिमाका) - अपवादात्मक परिस्थितींमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या क्षेत्रांमध्ये किंवा या विषयाशी संबंधीत किंवा आनुषंगीक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे पात्र आहेत. दि. 01/11/2019 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 व र्षे आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.   पारंपारीक व अपारंपारीक क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती इ. अपारंपारीक क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय व निरोगीपणा,...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा ----जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.04 (जिमाका) - नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे व त्यांना शेती कामांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने   शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 01/04/2015 ते 31/03/2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्गठन/फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक 30/09/2019 रोजी मुद्दल व व्याजासहीत थकीत असलेल्या व परतफेड न झा...

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -   सावित्रीबाई फुले यांच्या   जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस   उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.   यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी व महिला कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते. 00000

महिला व बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे --जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट विरार मिलिंद पोंगशे

Image
महिला व बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे                                             ---जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट विरार मिलिंद पोंगशे अलिबाग, जि. रायगड, दि.03 (जिमाका) -     महिला व बालकांबाबतचे गुन्हे ,   लैंगिक अत्याचार आणि फसवणूक करताना अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे ,   असे आवाहन जाणीव चॅरिटेबल स्ट्रस्ट विरारचे मिलिंद पोंगशे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून उन्नत सप्ताहा निमित्ताने जे.एस.एम.कॉलेज अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी जे.एस.एम.कॉलेज येथील लॉ कॉलेजच्या प्राचार्य ॲङरेश्मा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कदम, श्रीमती स्वाती ...

दर्जेदार सेवा हा ग्राहकांचा हक्क -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) - ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते.   ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी हा त्यांचा हक्क आहे. यासाठी त्यांच्या तक्रारींचे निराकरण होणे आवश्यक असून त्यासाठी ग्राहक चळवळीतील शासकीय व अशासकिय सदस्यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.   राज्य परिवहन आगार अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन-2019 निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष रविंद्र नगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार सचिन शेजाळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र रामसिंग राठोड,   जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, विभाग नियंत्रक श्रीम.अनघा बारटक्के आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर...

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2019-2020

            अलिबाग दि.21, क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगडद्वारा जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू (1 महिला, 1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता 1   यांच्या कार्याचे/ योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002 पासून देण्यात येतो, जिल्यातील उत्कृष्ट खेळाडॅ मार्गदर्शक व क्रीडा संघटक/ कार्यकर्ता यांना हा पुरस्कार 26 जानेवारी 2020 रोजी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सन 2019-20 च्या पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कारा मध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रु.10,000/- असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारा करिता 1 जुलै 2014 ते 30 जून 2019 पर्यतची कामगिरी/ कार्य ग्राह्य धरले जाईल. पुरस्काराचे थोडक्यात निकष खालील प्रमाणे आहेत. 1) गुणवंत खेळाडू :- या पुरस्कारा अंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महि...