Posts

अलिबाग तालुक्यातील मौजे मोरोंडे गावठाण्याचा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                      अलिबाग, जि. रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे मोरोंडे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या मोरोंडे गावाचे संपूर्ण  क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.   या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (...

जिल्ह्यात 155 पैकी 56 जणांनी करोना विरुध्दची जिंकली लढाई तर रुग्णालयातील दाखल 95 जणांचीही प्रकृती उत्तम

अलिबाग, जि. रायगड, दि.6 (जिमाका) :- जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी 1 हजार 150 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तपासणी अंती 966 नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.   आतापर्यंत जिल्ह्यात 155 जणांना करोना लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 56 रुग्णांनी करोनाला हरवून माणसाची जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या 56 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे.   दुर्देवाने 4 जणांचे   जगण्याचे प्रयत्न असफल झाले.               जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत उपजिल्हा रुग्णालय पनवेल-72 (उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-3 (उत्तम), रिलायन्स रुग्णालय, नवी मुंबई-2 (उत्तम),   एम.जी.एम. रुग्णालय, कामोठे- 3 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय- 2 (उत्तम), नायर रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम), बॉम्बे हॉस्पिटल, मु...

लॉकडाऊनमध्ये नवी मुंबई, पनवेल येथे अडकलेल्या मध्यप्रदेशच्या बाराशे व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने दिला समाधानाने निरोप

Image
            अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने मध्यप्रदेशमधील रेवा येथे पाठविण्यात आले. तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले.             यावेळी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त्‍ा कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार अमित सानप आदी उपस्थित होते.             कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मध्यप्रदेश येथील काही मजूर विविध जिल्ह्यात अडकले होते. तसे ते रा...

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 05 मे दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

Image
सुधारित वृत्त क्रमांक :- 284                                                                                दिनांक :- 05 मे 2020 महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग नवरे बिल्डींग, पाध्येवाडी,अलिबाग, जि. रायगड, पिन- 402201. Email: dioraigad@gmail.com dioraigadnews@gmail.com Website: www.mahanews.gov.in www.dgipr.maharashtra.gov.in Blog: dioraigad.blogspot.in दूरध्वनी : (02141) 222019 अलिबाग, जि. रायगड, दि.5(जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 05 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी न...

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 05 मे दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

अलिबाग, जि. रायगड, दि.5(जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 05 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 05/05/2020) - 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 9 हजार 342, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 3 हजार 615, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 5 हजार 520, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 52, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-2, पोलादपूर-1, महाड-1) -4, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल म...

परराज्यातील 13 हजार 44 व्यक्तींनी केले स्वगृही जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल

                                                 अलिबाग,जि.रायगड,दि.05(जिमाका):- दि.03,04 व 05 मे 2020 पर्यंत परराज्यातील एकूण 13 हजार 44 मजूरांनी/व्यक्तींनी आपआपल्या राज्यात स्वगृही जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड यांच्याकडून त्यापैकी 1 हजार 585 मजूर/व्यक्तींना प्रवासाकरिता परवानगी नाकारली असून 4 हजार 653 मजूर/व्यक्तींना प्रवासाकरिता परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे. 00000

अलिबाग तालुक्यातील मौजे तलवडे गावठाण्याचा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                      अलिबाग, जि. रायगड, दि.05 (जिमाका) : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे तलवडे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या तलवडे गावठाण्याचा संपूर्ण   परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहित...