Posts

भारताचे पहिलेबंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र (पोर्ट बेस्ड सेझएसईझेड) - जेएनपीटी सेझ झाले सुरू

अलिबाग, जि.रायगड,दि.20 (जिमाका):-    जेएनपीटी सेझ मध्ये 5 कंपन्यांनी आपले बांधकाम कार्य सुरु केले आहे. आणि त्यापैकी 2 कंपन्यांनी सेझमध्ये अलीकडे यशस्वीरित्या आपले कार्य सुरु केले आहे. सर्व तीन कंपन्यांना विकास आयुक्त, सिप्झ (एसईईपीझेड), एसईझेड यांनी कार्य सुरु करण्यास मंजूर दिली आहे. जेएनपीटी हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी नवी मुंबई येथे आपल्या मालकीच्या 277 हेक्टर क्षेत्रामध्ये बहु उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विकसित करत आहे. नौवहन मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर आधारित औद्योगीकरण सक्षम करून निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने या बहु-उत्पादन बंदर आधारित सेझचा विकास केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2014 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. अशा प्रकारच्या बंदर आधारित सेझचा विकास करणारे जेएनपीटीने हे देशातील पहिले बंदर ठरले आहे. जेएनपीटी सेझमधील दोन कंपन्यां , मेसर्स ओडब्ल्यूएस एलएलपी आणि मेसर्स क्रिश फूड इंडस्ट्री (इंडिया) यांनी आपल्या पहिल्या टप्प्यातील कार्य पूर्ण केले आहे व विकास आयुक्त , सिप्झ (एसईईपीझेड) , एसईझे...

स्थलांतरीत मजूरांना मूळ गावी जाण्याची संधी दि.12 ऑगस्टपर्यंत माहिती भरण्याचे कामगार विभागाचे आवाहन

वृत्त क्रमांक :- 996                                                                                        दिनांक :- 20 जुलै 2020             अलिबाग, जि.रायगड,दि.20 (जिमाका):-     जिल्हयात राहणाऱ्या परराज्यातील मजूरांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांनी   https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर स्वत:ची माहिती भरावी, असे आवाहन कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.             करोना प्रादूर्भावाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमित रेल्वे सेवा दि.12 ऑ...

रायगड जिल्ह्यातील 1 हजार 198 खेळाडूंना राज्य क्रीडा धोरणानुसार क्रीडा गुणांचा मिळणार लाभ

वृत्त क्रमांक :- 995                                                                                        दिनांक :- 20 जुलै 2020 अलिबाग, जि.रायगड,दि.20 (जिमाका):-   राज्याचे क्रीडा धोरण 2012 मधील शिफारशीनुसार राज्यातील इ.10 वी व 12 वी च्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या सर्व खेळाडू विद्या र्थ्यां ना क्रीडा गुण देण्यात येतात.               रायगड जिल्हयातील एकूण 1 हजार 198 खेळाडूंना या क्रीडा गुण सवलतीचा लाभ होणार आहे. जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविलेले किंवा विभाग स्तरावर सहभ...

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून रायगडकरांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लवकरच येणार पूर्णत्वास

अलिबाग, जि.रायगड,दि.20 (जिमाका):-   अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत दि.31 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.                या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी हे महाविद्यालय लवकर सुरू करण्याबाबत तसेच पुढील कार्यवाही होणेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे विनंती केली होती. त्याअनुषंगाने आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.         या बैठकीस वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उद्योग व खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय तसेच माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी हे सहभागी झाले होते.         ...

पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणे वगळली Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्रातून

अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उन्नती अपार्टमेंट, बिल्डिंग नं.1, सेक्टर-19 उलवे, रेसिडेंन्सी स्पेंल्डर को.ऑ.हौ.सो.प्लॉट नं.64, सेक्टर-19 उलवे, शांताराम चांगू घरत यांचे घर, पूर्वे,पश्चिम,दक्षिण, उत्तर बाजू वहाळ, फजल पटेल यांचे घर पश्चिम, उत्तर बाजू वाडेघर, ईन्काय क्लासिक, रुम नं.1402, प्लॉट नं.120 सेक्टर-05 उलवे, रेविरिया को.ऑ.हौ.एफ विंग चिपाले, समृध्दी भूमी को.ऑ.हौ.एफ विंग पालीदेवद,सुकापूर, मॅपल वुडस् को.ऑ.हौ.प्लॉट नं.93, सेक्टर-23 उलवे, सिध्दी अपार्टमेंट सी विंग सुकापूर, फॉरच्यून बेलेझा बिल्डिंग अे विंग, केवाले, मंगलमूर्ती कौ.ऑ.हौ.सो.बि विंग, रुम नं.01 विचुंबे, फ्युचर दर्शन बिल्डिंग प्लॉट नं.143, सेक्टर-04, करंजाडे, कालिदास गार्डन, पी विंग क्रोपोली,   रिध्दी-सिध्दी को.हौ.सो. अे विंग, कोळखे पेठ, मोरया गार्डन रेसिडेंन्सी बिल्डिंग नं.4 अे आणि 4 बी उसर्ली खुर्द, प्रजापती पावन कॉम्प्लेक्स अे विंग आदई, सदगुरु कृपा बिल्डिंग, जयराज शेठ निवास आणि आनंदी रेसिडेंन्सी घर नं.101, विचुंबे, कार्तिकी को.हौ.सो. अे विंग सुकापूर, दिशा ऑर्चिड बिल्डिंग प्लॉट नं....

कबड्डीप्रेमींच्या उपस्थितीत “21 वा कबड्डी दिन” मुंबईच्या कार्यालयात साजरा “कबड्डी महर्षी” शंकरराव (बुवा) साळवी यांना वाहिली आदरांजली

अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका) : :- “ कबड्डी महर्षी ” शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन (दि.15 जुलै) मुंबईच्या राज्य कबड्डी असो.च्या कार्यालयात अत्यंत साधेपणाने व मोजक्या कबड्डीप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.         यावेळी जेष्ठ खेळाडू भारतीय संघाचे संघनायक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तारक राऊळ, अर्जुन पुरस्कारप्राप्त श्रीराम (राजू) भावसार, मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू पंकज मोहिते यांच्या हस्ते प्रथम बुवांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मिनानाथ धानजी (संघटक-शिवछत्रपती पुरस्कार), रवींद्र करमरकर (शिवछत्रपती पुरस्कार), राजेश पाडावे (शिवछत्रपती), रमेश हरयाणा, मालोजी भोसले (सचिव-ठाणे जिल्हा), शशिकांत राऊत, सदानंद माजलकर, अनिल नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. “ कबड्डी महर्षी ” शंकरराव (बुवा) साळवी यांच्या स्मृति निमित्ताने धानजी, राजू भावसार, रवी करमरकर, रमेश हरयाणा यांनी बुवांच्या आठवणींना उजाळा दिला.   करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत व मास्क घालून हा कार्यक्रम यशस्वी करण...

भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील प्रथम सत्राकरिता प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

अलिबाग,जि.रायगड, दि.20 (जिमाका) : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) येथील 13 व बेंकटगिरी येथील 2 जागांच्या प्रवेशाकरिता पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात आले होते.   मात्र आय.आय.एच.टी बरगढ यांच्याकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता हे अर्ज दि.6 ऑगस्ट 2020 पर्यंत मागविण्‍यात येत आहेत.   प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे तसेच या अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातदेखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त माधवी खोडे-चवरे यांच्याकडून कळविण्यात आले आहे. ००००००