Posts

“कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आज जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे “ कोविशील्ड ” लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.               यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफ चे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.             प्रारंभी “ कोविशील्ड ” लसीकरण केंद्राचे   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचण्यात येवून कोविशील्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.      ...

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डिजिटल एक्स- रे,सि.आर.सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर,मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- आरसीएफ कंपनीकडून सीएसआरमधून जिल्हा शासकीय रुग्णालयाला देण्यात आलेल्या एक्स- रे,सि. आर.सिस्टीम, कॉन्ट्रास्ट इंजेक्टर,मॅमोग्राफी डिजिटल मशीनचे पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याहस्ते आज जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे लोकार्पण संपन्न झाले.               यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफ चे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ००००००

दिव्यांग व्यक्तींना दर बुधवार-गुरुवारी दिव्यांग प्रमाणपत्र वितरण सुरु

                अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ (यू.डी.आय.डी.कार्ड) बनवून मिळण्यासाठी दर आठवड्यातील बुधवार व गुरुवार हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दर बुधवारी केवळ अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी करण्यात येते, त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केवळ 50 अस्थिव्यंग रुग्णांना टोकन देऊन तपासणी करून त्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र वितरित येत, यासाठी विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सूचना देऊन तसे आदेश देण्यात आले आहेत.             तसेच दर गुरुवारी अस्थिव्यंग सोडून इतर सर्व (नेत्रदोष, कर्णबधीर, मानसिक दोष इ.) दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाण्याची व्यवस्था केली आहे.               या कामासाठी लागणारे संगणक, प्रिंटर आदि आवश्यक साधनसामुग्रीकरिता आरोग्य प्रशासनाला आरसीएफकडून सहकार्य मिळाले आहे. ...

मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,जि.रायगड दि.16   (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारी-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार, दि.5 व 12   फेब्रुवारी 2021 रोजी ता.अलिबाग.   सोमवार, दि.8 व दि.15 फेब्रुवारी 2021 रोजी ता. महाड. मंगळवार, दि.9 फेब्रुवारी 2021 रोजी ता.श्रीवर्धन.   बुधवार, दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी माणगाव. मंगळवार, दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी ता.रोहा. बुधवार, दि.17 फेब्रुवारी 2021 रोजी ता.मुरुङ ००००००

पिडित, तक्रारदार महिलांनी महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रारी अर्ज, निवेदन करावेत

            अलिबाग,जि.रायगड, दि.16 (जिमाका) :- महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व सामाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते.   महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये पिडित, तक्रारदार महिलांचे केवळ वैयक्तिक स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जातात. तक्रार, निवेदन दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.   आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये अर्ज, सेवा विषयक अर्ज, आस्थापना विषयक अर्ज स्वीकारले जात नाहीत.   या महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रारी अर्ज, निवेदन सादर करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी कार्यालय, घर नं. 738, निलपुष्क, डोंगरी-चेंढरे एमआयडीसी कार्यालयासमोर,अलिबाग (दूरध्वनी क्र.02141-225321) या कार्यालयात तक्रार अर्ज, निवेदन दोन प्रतीत ...

सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

            अलिबाग,जि.रायगड, दि.16 (जिमाका) :- जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे   कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण   सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित   कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.           त्यानुसार डिसेंबर, 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ई-आर-1 मधील त्रैमासिक सांखिकी   माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व...

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शनिवार, दि.16 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 8.00 वा मुंबई येथून बोटीने मांडवाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. मांडवा येथे आगमन व शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. अलिबाग येथे आगमन व कोविड लसीकरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, सकाळी 9.30 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने मेंदडी ता.म्हसळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. मेंदडी येथे आगमन व मेंदडी कोंड नळ पाणीपुरवठा योजना भुमिपूजन. दुपारी 12.45 वा. मेंदडी पिकअप शेड उद्घाटन. दुपारी 1.00 वा. मेंदडी येथील आगरी समाज नळ पाणीपुरवठा   योजना भुमिपूजन. दुपारी 1.30 वा. काळसुरी येथे महिला सामाजिक सभागृह उद्घाटन. दुपारी 2.00 ते 3.00 राखीव. दुपारी 3.00 वा. पंचायत समिती म्हसळा कार्यालयास भेट. दुपारी 3.30 वा. म्हसळा येथून शासक...