Posts

सुयोग्य बदलासह पीक स्पर्धा खरीप हंगाम 2021 साठी नव्याने स्पर्धा जाहीर शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात आहे. सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत :- पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी). तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आ...

केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयांतर्गत “संवेदना” दूरध्वनीद्वारे कोविड-19 मुळे प्रभावित मुलांना समुपदेशन 1800-121-2830 या टोल फ्री क्रमांकावरुन कोविड-19 मुळे तणावग्रस्त असलेल्या मुलांना दिला जातो मानसिक आधार

    अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) : कोविड-19 मुळे प्रभावित   मुलांना मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) संवेदना   (भावनिक विकासाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत   संवेदनशील कृती) दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जात आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ही एक वैधानिक संस्था असून महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारीत कार्यरत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात पीडित मुलांसाठी मनोवैज्ञानिक -सामाजिक मानसिक आधार देण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. कोविड - 19 संदर्भात विविध मनोविकार विषयक मुद्द्यांना बालक आणि किशोरवयीन मानसोपचार विभागाचे प्रा.डॉ.शेखर शेषाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पात्र तज्ञ/समुपदेशक/मानसशास्त्रज्ञांच्या नेटवर्कद्वारे दूरध्वनीवरून हे समुपदेशन दिले जात आहे. महामारीच्या संकटात तणाव, चिंता, भीती आणि इतर समस्या सोडवण्यासाठी मुलांना मानसिक आधार देणारी संवेदना ही समुपदेशन सेवा   आहे. ही सेवा टोल-फ्री क्रमांक: 1800-121-2830 वर सोमवार ते ...

खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,सावरोलीसाठी मौजे सावरोली येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सावरोली या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                या पार्श्वभूमीवर मौजे सावरोली ता.पोलादपूर येथील स.नं. 38/23, क्षेत्र 7-84-00 हे.आर. पैकी 0-05-00 हे. आर. ही जमीन भोगाधिकारी   मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सावरोलीकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.               खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   ०००००

रोहा तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसईसाठी मौजे शेणवई येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- रोहा तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसई या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                या पार्श्वभूमीवर मौजे शेणवई ता.पोलादपूर येथील स.नं. 134अ क्षेत्र 3-96-00 हे.आर. पैकी 0-10-00 हे. आर. ही जमीन महसूल मुक्त व सारामाफीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसईकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.               रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   ०००००

पोलादपूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजेसाठी मौजे देवळे येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- पोलादपूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजे या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                 या पार्श्वभूमीवर मौजे देवळे ता.पोलादपूर येथील स.नं. 109 क्षेत्र 00- 16-00 हे. आर. या जागेपैकी 00- 05-00 हे.आर. ही जमीन ग्रामपंचायत देवळे यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन महसूल मुक्त व सारामाफीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजेकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.               पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   ०००००

मुरुड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांडलासाठी मौजे तळवली येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- मुरुड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांडला या  इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               या पार्श्वभूमीवर मौजे तळवली ता.मुरुड येथील गट नं.373, क्षेत्र 0-21-00 पैकी 0-05-00 हे.आर. ही जमीन महसूल मुक्त व सारामाफीने मौजे तळवली, ता.मुरुड येथील जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांडला करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.              मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.  000000

महाड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,दाभोळसाठी मौजे दाभोळ येथील शासकीय जागा हस्तांतरित

अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- महाड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दाभोळ (पाटीलवाडी) इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               या पार्श्वभूमीवर मौजे दाभोळ ता.महाड येथील गावठाण क्षेत्र 9-93-00 हे. आर. या मिळकती पैकी क्षेत्र 0-04- 41 हे.आर. ही जमीन ग्रामपंचायत दाभोळ यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन महसूल मुक्त व सारामाफीने ही जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दाभोळ (पाटीलवाडी) करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.              महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.  000000