Posts

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग, दि.7 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषद, अलिबाग कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत असून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवित असते. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये नवीन विहीर या घटकाचा लाभ असल्याने जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येवून पीक उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत/ क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलित आदिवासी उपयोजना ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) या नावाने दि.30 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे.   लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे, शेतकऱ्याकडे...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

          अलिबाग, दि.7 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषद, अलिबाग कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत असून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवित असते. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये नवीन विहीर या घटकाचा लाभ असल्याने जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येवून पीक उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलित विशेष घटक योजना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने सन 2016-17 पासून राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जाती...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासन आदिवासी बांधवांच्या सदैव पाठीशी --विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना वन हक्कांचे दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Image
           अलिबाग, दि.6 (जिमाका):-   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासन आणि संपूर्ण प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे   यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे केले.                जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना वन हक्क दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करीत आज दि.06 जानेवारी 2022 रोजी पेण नगरपरिषद सभागृह येथे संपन्न झाला, त्यावेळी त्या दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या.                यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर आमदार श्री.रवी पाटील, अलिबाग उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प...

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक होणार दि.12 जानेवारी रोजी

    अलिबाग, दि.6 (जिमाका):-   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार, दि.12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वा. ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. ०००००००

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी कोविड लसीकरण शिबिर कार्यक्रम संपन्न

Image
    अलिबाग, दि.6 (जिमाका):-   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकरिता दि.06 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पनवेल महानगरपालिका   व तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कारागृहात नवीन दाखल झालेल्या कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला.   तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दाखल 2 हजार 818 बंद्यापैकी 2 हजार 816 बंद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर यापूर्वीच 2 हजार 180 कैद्यांना   कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिली आहे. यावेळी तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री.यु.टी.पवार,पनवेल तहसिलदार विजय तळेकर तसेच पनवेल महानगरपालिकेचे लसीकरण वैद्यकीय पथक उपस्थित होते. ०००००००

पनवेल शासकीय जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

    अलिबाग, दि.5 (जिमाका):- शासकीय आय.टी.आय. पनवेल येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. रायगड जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा संस्थेचे विद्यमान प्राचार्य के.डब्ल्यू.खटावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पनवेलचे उप कोषागार अधिकारी श्री.जाधव, महाड आयटीआयचे प्राचार्य श्री.नलावडे, पनवेल संस्थेचे उपप्राचार्य श्री.व्ही. डि. टिकोले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उप कोषागार अधिकारी श्री.जाधव, महाडचे प्राचार्य श्री.नलावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना सावित्रीमाईंच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष अभियान कार्यक्रम स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुसूचित जातीच्या विविध व्यवसायातील पात्र प्रशिक्षणार्थ्यांना टूल कीट्सचे वाटप करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.खटावकर यांनी उपस्थित विद्यार्थी,...

अलिबाग तालुक्यातील साखर आक्षी बंदर येथे अवैध एल.ई.डी. व पर्ससीन नौकांवर जप्तीची कारवाई मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले होते आदेश

    अलिबाग, दि.5 (जिमाका):- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग अवैध मासेमारी विरोधात कमालीचा सक्रीय झालेला दिसून येत आहे. सिंधुदुर्गनंतर आता रायगड जिल्ह्यातही एलईडी आणि अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सुधारित सागरी अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आज दि.05 जानेवारी 2022 रोजी प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय महेश देवरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. साखर आक्षी बंदराच्या चॅनलमध्ये मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मुंबई संजय माने यांच्यासह परवाना अधिकारी. तुषार वाळूज, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी गणेश टेमकर, महादेव नांदोस्कर यांनी 1 अवैध एल.ई.डी. व 2 अवैध पर्ससीन नौका पकडल्या असून, या तीनही नौकांवर कोणतेही कागदपत्रे नव्हते. या 3 नौकांवर सुधारित कायद्यानुसार कारवाई करुन प्रतिवेदन दाख...