Posts

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता..सेवा पंधरवडा”, जिल्हा प्रशासनाचा शून्य प्रलंबिततेचा संकल्प

Image
  नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर  जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीमेची आढावा बैठक संपन्न अलिबाग,दि.22 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत  “ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ”  निमित्ताने आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने शून्य प्रलंबिततेचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने या मोहिमेच्या कार्यवाहीबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. या विशे...

बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांनी कंत्राटी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दि.3 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत

अलिबाग,दि.22 (जिमाका):-   बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने  रु.3 लाख पर्यंत इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडून कंत्राटी कामांकरिता पत्र प्राप्त झाले आहे. ज्या सेवा सोसायट्यांचे कार्यक्षेत्र पेण तालुक्याकरिता आहे, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास उपरोक्त कंत्राटी काम मिळण्याबाबतचे त्यांचे प्रस्ताव दि.03 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत. आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य असून उशिरा प्राप्त झालेले, अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नसल्याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा कार्यालयाच्या 02...

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज 30 सप्टेंबर पूर्वी भरावेत

  अलिबाग,दि.22 (जिमाका):-     शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी मधील फक्त मुलींसाठी असलेल्या बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन विद्यार्थीनींचे ऑनलाईन अर्ज दि.30 सप्टेंबर 2022 पूर्वी भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी आणि जैन या धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांनी  www.scholarship.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन संचालक श्री.पाटील यांनी केले आहे. 00000

शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील स्वयंपाकी, मदतनीस व इतर कर्मचाऱ्यांकरीता स्वयंपाकाच्या गॅस वापर व सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Image
  अलिबाग,दि.22 (जिमाका):-   “ सेवा पंधरवडा ”  कार्यक्रमांतर्गत आज दि.22 सप्टेंबर 2022 रोजी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथे वसतिगृहातील स्वयंपाकघरात गॅस वापरताना कुठल्याही प्रकारची दूर्घटना घडू नये, याकरिता हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने वसतिगृहातील गृहपाल, स्वयंपाकी, मदतनीस व इतर कर्मचारी यांच्याकरिता  “ एलपीजी सिलेंडर, शेगडी इत्यादीचा शास्त्रशुध्द वापर कसा करावा? ”  याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेत श्री.निशाद पाटील व कु.सायली मोरे यांनी स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर वापरताना कोणती काळजी घ्यावी? कोणकोणत्या चुका टाळाव्यात याविषयीची माहिती दिली. त्यामुळे आपण आपल्या वसतिगृहात तसेच प्रत्येकाच्या घरातही सुरक्षित राहू शकतो. दोनही वसतिगृहातील स्वयंपाकी व मदतनीस यांना उपयुक्त अशी माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक श्रीमती माधुरी पाटील यांनी केले. तर श्रीमती उषा गुजेला यांनी उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांचे आभार मानले. 00000

चला, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडू, मतदारयादीतील स्वतःची ओळख प्रमाणित करू..!

Image
  अलिबाग,दि.22 (जिमाका):-  भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून सर्व मतदारांना आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड संलग्न करण्याबाबत निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालील रायगड जिल्ह्यातील मतदारांची मतदार ओळखपत्रासोबत आधार जोडणी करण्यासाठी जिल्हा अंतर्गत विविध उपक्रम व विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी जिल्ह्यातील सर्व हौसिंग सोसायटीमध्ये आधारकार्ड मतदार कार्डसोबत लिंक करणे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यासाठी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांना आवाहन केले आहे. ज्या नागरिकांना आपल्या हौसिंग सोसायटीमध्ये आधार जोडणी शिबीर आयोजित करावयाचे आहे त्यांनी आपल्या जवळील मतदार नोंदणी कार्यालय (तहसील/ उपविभागीय अधिकारी कार्यालय) येथे संपर्क साधावा. कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक:- 188 पनवेल विधानसभा मतदारसंघ- 022-27452328 / 022-27469134 189 कर्जत विधानसभा मतदारसंघ- 02148-223499 190 उरण विधानसभा मतदारसंघ- 022-27222129 91 पेण विधानस...

मधमाशा पालन व्यवसाय जनजागृतीकरिता दि.27 सप्टेंबर रोजी मोफत प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन

  अलिबाग,दि.22 (जिमाका):-   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, विशेष घटक योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरजू सुशिक्षित बेरोजगार, बलुतेदार, फळ बागायतदार, यांच्या कौशल्यास वाव देण्यासाठी, अर्थसहाय्य देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत अशा प्रकारचे सहाय्य शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना केले जाते. याबाबतच्या मोफत प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन दि.27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मु.पो.वारे, ता.कर्जत, जि.रायगड येथे करण्यात आले आहे. मध केंद्र योजनेंतर्गत शेतकरी फळबागायतदार यांच्या शेतमालाचे परागीभवनामुळे 40 टक्के पर्यंत कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी पूरक उद्योग स्थापनेसाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूकीद्वारे उद्योग स्थापन करता येतात. याकरिता 10 व 20 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. वाया जाणाऱ्या जंगल व फळबागायतीच्या फुलोऱ्यामुळे मधमाशा पाळून निसर्गाचे संरक्षण व संवर्धनासाठी तसेच त्यातून मिळणाच्या मध, मेण, विष, पराग इ. उप उत्पादने मि...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत 108 प्रकरणांना बँकेची मंजूरी

  अलिबाग,दि.22 (जिमाका):-  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग या अंमलबजावणी यंत्रणेस रायगड जिल्ह्याकरिता 800 प्रकरणांचे उद्दिष्ट वाटप करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत एकूण 108 प्रकरणांना बँकेची मंजूरी मिळाली असून त्यातील प्रकल्प किंमत रक्कम रु.173.88 लाख इतका आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात अमलबजावणी यंत्रणेद्वारे एकूण 740 प्रकरणे जिल्हा कार्यबल समितीच्या मंजूरीद्वारे बँकेकडे शिफारस करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात सन 2019 पासून अद्यापपर्यंत एकूण 157 प्रकरणात प्रत्यक्ष अनुदान वाटप करण्यात आले असून त्यातील अनुदान रक्कम रु.331.85 लाख इतकी आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेंतर्गत उत्पादन उद्योगाकरीता रु.50 लाख व सेवा उद्योगाकरीता रु.10 लाख ...