“युवा संवाद-भारत @ 2047” कार्यक्रमातील सहभागासाठी इच्छुक समुदाय आधारित संस्थानी अर्ज सादर करावेत
अलिबाग,दि.21 (जिमाका):- पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव-स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करीत आहोत. पंतप्रधान श्री.मोदी यांनीही त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात “ पंच-प्राण-मंत्र ” ची घोषणा केली होती. “ अमृत कालच्या काळातील भारत @ 2047 ची झलक ” या संदर्भात युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) दि.1 एप्रिल 2023 ते दि.31 मे 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्था (CBO) “ युवा संवाद-भारत @ 2047 ” या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. जिल्ह्याच्या विविध CBOs (समुदाय आधारित संस्था) च्या मदतीने आणि साहाय्याने जिल्हा स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. जे “ पंच-प्राण-मंत्र ” अनुरूप देशाचे भविष्य आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी, जिल्हा नेहरु युवा केंद्रासोबत काम करतील, अशी पंतप्र...