Posts

राष्ट्रीय लोक अदालत रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली

Image
राष्ट्रीय लोक अदालत रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली             अलिबाग दि.14(जिमाका) :-  राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 11 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 324 प्रकरणे निकाली काढण्यात आली.             यावेळी मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश,रायगड  तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग,  के.आर.पेटकर, जिल्हा न्यायाधीश-1,  एल.डी.हुली, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अलिबाग, तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि अन्य न्‍यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, ॲड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रविण ठाकूर, सचिव ॲड. अे.डी.पाटील, मेट्रो सेंटर पनवेलचे भूसंपादन अधिकारी तसेच वकील वर्ग व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. ...

सण उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
सण उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखावी                                                        -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.13 (जिमाका) :- आगामी  काळातील सण उत्सवाच्या वेळी रायगड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी सर्वांनी दक्ष रहावे असे आवाहन  जिल्हाधिकारी  श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.   आगामी काळात येणाऱ्या सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक तसेच समिती सदस्य, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदिप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे आदि उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना त्या पुढे म्हणाल्या की, आगामी काळा...

निर्भय,मुक्त व पारदर्शी निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

निर्भय,मुक्त व पारदर्शी निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज                                                      ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.13 (जिमाका) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका-2017 निर्भय, मुक्त,पारदर्शीपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदिप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेस...

मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य तथा विविध उपक्रम

Image
दिनांक:- 10/02/2017                                                                                                          वृत्त क्र. 79 मतदान जनजागृतीसाठी  पथनाट्य तथा विविध उपक्रम अलिबाग दि.10 (जिमाका ) :- रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्वात्रिक निवडणूक-2017 चे मतदान 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे.  मतदानाची टक्केवारी वाढावी  यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन व  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यामार्फत विविध उ...

रायगड जि.प.,पं. समिती निवडणूक मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह

दिनांक:- 10/02/2017                                                                                                          वृत्त क्र. 78 रायगड जि.प.,पं. समिती निवडणूक मुख्य निवडणूक निरीक्षक शेखर सिंह                 अलिबाग दि.10 (जिमाका ) :-   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता रायगड जिल्ह्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह  यांची नियुक्ती करण्यात आली असून...

स्वच्छ रायगड जिल्हा जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर

Image
स्वच्छ रायगड जिल्हा जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक                                                              - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर अलिबाग दि.09 (जिमाका) संपूर्ण रायगड जिल्हा आता स्वच्छ होण्याच्या अंतिम टप्प्यात असून त्यासाठी  स्वच्छतेची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या निमित्त होणाऱ्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयात केले.  मुंबई विद्यापीठ, पीएनपी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमान...

पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहिर

Image
पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहिर               अलिबाग दि.08 (जिमाका ) :-    रायगड जिल्हयातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यात करण्यात आली.  आज  दि. 8 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग येथे जिल्हाधिकारी श्रीमती तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  सभेत आरक्षण सोडतीद्वारे जाहिर करण्यात आले.               यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार (सामान्य) अजित नैराळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरक्षण         पंचायसमितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.   सर्वसाधारण- तळा, माणगाव, कर्जत, महाड.  सर्वसाधारण महिला - मुरुड, म्हसळा, खालापूर, श्रीवर्धन....