Posts

ओखी चक्रीवादळः जिल्ह्यातील 243 बोटी सुखरुप परतल्या :किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.4,(जिमाका)- ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध बंदरांतून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींपैकी 243 बोटी किनाऱ्यावर सुखरुप परतल्या असून उर्वरित सात बोटी परतीच्या प्रवासात आहेत. दरम्यात जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर निरंतर लक्ष ठेवून आहे. सर्व प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणा सज्ज आहेत. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहिती नुसार, ओखी चक्रीवादळाचे मार्गक्रमण समुद्रातून गुजराथ किनाऱ्याकडे सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र  पुढील 48 तासात वादळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रती तास राहणार असून समुद्र खवळलेला असणार आहे. आज( सोमवारी) दुपारी  12 वा. चार मिटर पर्यंत भरती आली होती. त्या काळात कोणताही अनुचित घटनेचे वृत्त नाही. मध्यरात्रीनंतर (मंगळवारी) पहाटे एक वा. पुन्हा 5 मिटर भरती येणार आहे. या काळातही सखल भागात सतर्कतेचा इश...

चिरनेर, दिघोडे ग्रा.पं.निवडणूक;स्वाधीन अधिकाऱ्यास अधिकार प्रदान

अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.2-   ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2017 चा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केल्यामुळे 24 नोव्हेंबर,   पासून आचारसंहिता अंमलात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ-2 पनवेल विभागातील उरण पोलीस ठाणे हद्दीत 1) चिरनेर, 2) दिघोडे ग्रामंपचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून 26 डिसेंबर, रोजी मतदान व 27 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत तेथील कायदास सुव्यवस्था अबाधित रहावी व मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडावे म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 36 प्रमाणे    प्राप्त अधिकारानुसार नवी मुंबई पोलीस आयुकतालय हद्दीतील चिरनेर, दिघोटी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने परिमंडळ-2 पनवेल मधील उरण पोलीस ठाणेचे स्वाधीन अधिकारी  मिरवणूकीचा मार्ग व वेळ निश्चित करणे, जमावाचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे, ध्वनीक्षेपकाच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करुन दिलेली वेळ यावर , जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत...

आधारभूत किंमत धान्य खरेदी योजना:अलिबाग व रोहा येथे भात खरेदी केंद्र सुरु

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2-   आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या  या अभिकर्ता संस्थांमार्फत शासनाची भात खरेदी केंद्र अलिबाग व रोहा येथे  सुरु करण्यात आली आहेत. भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपलेकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उतारा आणणे आवश्यक आहे. उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान, भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे 7/12 उताऱ्यानुसार पीकाखाली क्षेत्र, या वर्षीची पीक   परिस्थिती (पैसेवारी), पीकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन धान, भरडधान्य खरेदी करण्यात येईल. 7/12 उतारा आवश्यक ऑनलाईन खरेदी या धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. यासाठी धान खरेदी केंद्रावर आणताना प्रत्येक शेतकऱ्यांने सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकाची छायाप्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान,भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहील. आधारभूत किंमत निश्चि...

सशस्त्र सेना ध्वजदिन -2017 निधी संकलन शुभारंभ 8 रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- सशस्त्र सेना ध्व्जदिन -2017 निधी संकलन शुभारंभ सोहळा शुक्रवार दि.8 रोजी सकाळी साडे दहा वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.विजय सुर्यवंशी जिल्हाधिकारी  तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती रायगड यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली   संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र.जाधव (नि.) यांनी कळविले आहे. ०००००

जिल्हा रुग्णालयात मौखिक स्वास्थ्य तपासणी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2 - येथील जिल्हा रुग्णालया मौखिक स्वास्थ मोहिमेनिमित्त मौखिक स्वास्थ्य तपासणीचे आयोजन दि.२ ते ३१ डिसेंबर या कालावधी करण्यात आले आहे. या मोहिमेचे उदघाटन  शनिवारी  जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, डॉ. शैलेश धारवाडकर डॉ.मेहता, दंतशल्यचिकित्सक डॉ.ऋतुजा माळी, डॉ. प्रियंका पिंगळे, अधिसेविका श्रीम.मोरे, दंतरोग तज्ज्ञ जय प्रकाश वाघ आदी  उपस्थित हेाते. या मोहिमेद्वारे जनजागृती व मुख तपासणी करण्यासाठी  रायगड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय अलिबाग  व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने ही मोहिम राबविण्यात येत आहे. 0000

ओखी चक्रीवादळः जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग,जि. रायगड, दि.2,(जिमाका)- प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या 2 डिसेंबर रोजीच्या पूर्वसूचनेनुसार पुढील 72 तासांमध्ये ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस (अतिवृष्टी) पडण्याची व समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात मच्छिमार गेले असल्यास त्यांना तात्काळ समुद्र किनाऱ्यावर परतण्याचा इशारा देण्यात येत आहे. तसेच चक्रीवादळाचा धोका कमी होईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा तसेच किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वसूचना लक्षात घेवून आपल्या विभागाकडून च्रकीवादळामुळे व अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रमाणात उपाय योजना कराव्यात. तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आपल्या विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका इत्यादी अत्यंत आवश्यक सुविधा तत्पर ठेवण्यात याव्यात. चक्रीवादळामुळे झाडे पडून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता विचारात घेवून पूर्वतयारी करण्यात यावी. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्य...

उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल कार्यालयाचे नवीन जागेत स्थळांतरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 02 :- उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल हे कार्यालय भाडे तत्वावर उरण पनवेल आगरी समाज हॉल, पहिला मजला, कन्या शाळेसमोर पनवेल येथे यापूर्वी कार्यरत होता .परंतु आता ते नवीन जागेत स्थळांतरील झाले असून  त्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. सिडको समाज मंदीर, तळमजला, सेक्टर-18 बांठिया शाळेजवळ, नवीन पनवेल असे आहे.असे उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 0000