Posts

ग्रा.पं. निवडणूकः मनाई आदेश जारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 10- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2018 चा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.22 जानेवारी पासून आचार संहिता अमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात नवी मुंबई पोलीस हद्दीत परिमंडळ-2 पनवेल विभागातील पनवेल शहर  पोलीस ठाणे हद्दीत वडघर ग्रामपंचायत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत सोमटणे,मोरबे, खैरवाडी ग्रामपंचायत. खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत आदई,विचुंबे ग्रामपंचायत, उरणे पोलीस ठाणे हद्दीत म्हातवली ग्रामपंचायत, न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीत गव्हाण,फुंडे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींची रिक्त पदासाठीची पोट निवडणूक होणार  असून  मतदान दि.25 फेब्रुवारी  रोजी होणार असून मतमोजणी 26 फेब्रुवारी  रोजी होणार आहे.  या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहून मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावे यासाठी पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई  यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) मनाई आदेश जारी अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 मधील एनआरआय पोलीस ठाणे व परिमंडळ-2 पनवेल विभ...

इ.10 व 12वीच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभागी खेळाडूंना क्रीडा गुण सवलत:15 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.:- 9 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन दि. २१ एप्रिल, २०१५ नुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परिक्षेस प्रविष्ट होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्यासंदर्भातील सुधारीत कार्यपद्धतीस शासन मान्यता देण्यात आली आहे.             शासन निर्णयातील परिशिष्ट “ अ ” नुसार भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण पुरस्कृत खेळ, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित खेळ, भारतीय ऑलिंपिक व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची संलग्नता असलेले एकविध खेळाच्या राज्य संघटना आयोजित खेळ क्रीडा गुणांसाठी ग्राह्य असणार आहेत. एकविध खेळाच्या  राज्य संघटनेमार्फत आयोजित करण्यात येणा-या स्पर्धांचे अहवाल शासन निर्णयातील परिशिष्ट “ ब ” मधील कागदपत्रांच्या यादीनुसार परिपुर्ण असतील तरच खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळण्याकरीता शिफारस करण्यात येईल. एकविध खेळाच्या संघटनेमार्फत ...

रस्ते विकासाचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा-प्रधान सचिव आशिषकुमार सिंह

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9:- राज्याच्या आर्थिक विकासाकरीता रस्त्यांचा विकास करणे गरजेचे असून त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राज्यस्व सभागृहात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आज दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अधिक्षक अभियंता नवी मुंबई गोपीनाथ मोहिते, कार्यकारी अभियंता महाड विश्वनाथ सातपुते, कार्यकारी अभियंता अलिबाग राहुल मोरे, कार्यकारी अभियंता पनवेल आर.आर.पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रधान सचिव आशिषकुमार सिंह म्हणाले की, राज्याच्या आर्थिक विकासाकरीता रस्त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. रस्ते विकासाचे प्रस्ताव सादर करताना, रस्त्याची पाहणी करावी, योग्य नियोजन करुन रस्ते विकासाला किती निधी लागणार आहे या बाबींचा विचार करुन प्रस्ताव सादर करावा. नंतरच निधी वितरीत करण्यात येईल. निधीचे योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील जे खराब रस्ते आहेत त्यांचे काम करावे. रस्त्याचे काम उत्कृष्ट दर...

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित कामांचा आढावा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने करावयाच्या रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित कामांचा आज जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचे समवेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहसचिव अरुण उन्हाळे, अवर सचिव श्रीरंग घोलप, तसेच जागतिक बँक पथकाचे एम.ए.दशरक्षी, वेंकटक विनोदकुमार गौतम, आशिष बोधले, पी गोपाल कृष्णन, शिरीष कुलकर्णी, सी.एम.मिश्रा, एस.पी.स्वामी, एम.ए. भोसले, खारभुमी विभागाचे उपअभियंता एस.जे.शिरसाठ, महावितरणचे माणिकलाल तपासे,  सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली की, राष्ट्रीय चक्री वादळ धोके निवारण प्रकल्पात राज्यातील समुद्र किनारी असलेल्या शहरांचा व जिल्ह्यांचा समावेश आहे. यात कोकणातील अलिबाग, जि.रायगड, रत्नागिरी आणि सातप...

ढगाळ वातावरण व पावसाळा सदृश्यस्थितीमध्ये आंबा पिकाची घ्यावयाची काळजी

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.8- बंगालच्या उपसागरात व श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाप्षयुक्त वातावरण दक्षिणेकडे खेचले जात आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदूर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आंबा पिकामध्ये तुडतुड्याचा प्रभाव मोठया प्रमाणावर होऊ शकतो. तसेच पाऊस पडल्यास आंबा मोहरावर करपा रोग आणि भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झॉम 25 W.G. (तीन ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी सोबत करपा व भूरी रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डेझीम मॅन्कोझेब (साफ, सफाई, कॅम्पनियन) हे तयार मिश्रण 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच ज्या आंबा बागेमध्ये पानगळ सुरु आहे अशा बागांमध्ये लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सल्फर 80 W.G. (80 टक्के पाण्यात विरघळ...

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते हे शुक्रवार दि. 9  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार दिनांक 9  रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मुंबई येथून हेलिकॉप्टरने बिरवाडी महाडकडे प्रयाण. जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण. दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बिरवाडी,एमआयडीसी,हेलिपॅड ता.महाड जि.रायगड येथे आगमन. दुपारी दोन वाजता  बिरवाडी, एमआयडीसी, हेलिपॅड ता.महाड जि.रायगड येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण. 0000

पेण पं. स.ची आमसभा गुरुवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:-   पेण पंचायत समितीची आमसभा गुरुवार दि.8 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. आ.धैर्यशील मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यात सन 2017-18 या वर्षाचाकामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून आगरी समाज विकास मंच हॉल, चिंचपाडा पेण, जि.रायगड येथे ही बैठक होणार आहे. या आमसभेस उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. ० 0000