रायगड जिल्हा पोलीसांना 'कोटपा' कायद्याचे प्रशिक्षण: तंबाखूजन्य पदार्थ विक्री विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा-पोलीस अधिक्षक पारस्कर
अलिबाग, जि. रायगड, दि.27(जिमाका)- कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खुलेआम धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचा स्वतःच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोच , पण त्याच्या जवळपास असणाऱ्या निर्व्यसनी निर्दोष लोकांच्या आरोग्यावरही त्याच्या धूम्रपानाचा परिणाम होतो. दुर्दैवाने युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा-2003 (कोटपा) ची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, यांनी दिले. सार्वजनिक ठिकाणी , शाळा परिसरात खुलेआम सिगारेट फुंकणाऱ्यावर , तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर लगाम घालणाऱ्या सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा-2003(कोटपा) च्या अमंलबजावणी संदर्भात रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (दि.२६) पोलीस अधिकाऱ्यांसाठी एका खास प्रशिक्ष...