Posts

पर्यटक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 -   वर्षापर्यटन, गड किल्ले, वन भ्रमंती आणि  गिर्यारोहणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या  पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पर्यटक सुरक्षा उपायांची यंत्रणेने अंमलबजावणी करावी,  तसेच पर्यटनस्थळी व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिले.   मान्सून पर्यटनाच्या काळात पर्यटक धबधबे, समुद्र किनारे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. उत्साहाच्या भरात पर्यटक नको त्या संकटात सापडून प्रसंगी प्राणाला मुकतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभय यावलकर यांच्या सह अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क   विभाग सीमा झावरे, उपवनसंरक्षक रोहा,    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागरकुमार पाठ...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मि.मि.पावसाची नोंद

      अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.34 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 445.45   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 65.00 मि.मि., पेण-135.40 मि.मि., मुरुड-95.00 मि.मि., पनवेल-20.20 मि.मि., उरण-40.00 मि.मि., कर्जत-7.00 मि.मि., खालापूर-54.00 मि.मि., माणगाव-64.00 मि.मि., रोहा-120.00 मि.मि., सुधागड-30.50 मि.मि., तळा-50.00 मि.मि., महाड-36.00 मि.मि., पोलादपूर-49.00, म्हसळा-90.40मि.मि., श्रीवर्धन-145.00 मि.मि., माथेरान-45.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1061.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 66.34 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   15.03 टक्के इतकी आहे. ०००००

जिल्हा क्रीडा संकुलात सामुहिक योगाभ्यासाने साजरा झाला योग दिवस

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 - जिल्हा क्रीडा संकूल नेहुली येथे सामुहिक योगाभ्यासाचे आयोजन करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिवस (21 जुन) हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीन आज जिल्हा क्रीडा संकूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे,   जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम साळूंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पाथरुट, तहसिलदार प्रकाश संकपाळ, लोखंडे   आदी उपस्थित होते.   यावेळी अंबिका योग कुटीर या संस्थेचे संचालक योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले.   या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांनी सहभाग घेतला होता...

अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 -   भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेध शाळेकडून प्राप्त अंदाजानुसार शुक्रवार दि.22 जून ते सोमवार दि.25 जून   पर्यंत उत्तर कोकण भागात ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसेच येत्या 48 तास समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4.81 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.81 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 481.76   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 0.00 मि.मि., पेण-2.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-8.40 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-30.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-8.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-14.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-7.00 मि.मि., माथेरान-1.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 76.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 4.81 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   15.33 % इतकी आहे. ०००००

सेवाविषयक बाबी ऑनलाईन; 248 जि.प. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 - केडर मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या सेवा विषयक बाबी ऑनलाईन करण्याबाबत विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीचे जिल्हा परिषदेच्या 248 कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.19) प्रशिक्षण घेतले.   यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.ही संगणक प्रणाली एनआयसी ने विकसित केली आहे. ग्राम विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्या पुढाकारामुळे ही संगणक प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करणे,पदोन्नती,बदली रजा या सारख्या सेवा विषयक अनेक बाबी ऑनलाईन करण्यात येणार आहेत. या ऑनलाईन संगणक प्रणालीबाबतचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण मंगळवार दि.   19   रोजी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय प्रभाकर पाटील सभागृहात आयोजित पार पडले. या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रभारी अतिरिक्त् मुख्य् कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्या हस्ते झाले. या प्रशिक्षणास रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व स्तरावरील एकूण 153 कार्यालयातील 248 कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित हो...

योग दिन आयोजनाचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 - केंद्र व राज्यशासनाने 21 जुन हा दिवसा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. राज्यशासनाने प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन गाव पातळीपर्यंत योग विद्येचा प्रसार होण्याच्यादृष्टीने खाजगी योग प्रसार करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून   संबंधित प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे,चर्चासत्र कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम,जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये महाविद्यालये विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एनएसएस नेहरु युवा केंद्र इ.युवा संघटनामार्फत योगा संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षी दिनांक 12 ते 16 जानेवारी या कालावधीत 5 दिवसांच्या योगा उत्सवाचे आयोजन करणे असे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांबरोबरच सर्व शासकीय कार्यालय, सर्व ग्रामपंचायती,पंचायत समित्या या ठिकाणी गुरुवार दि.21 जुन रोजी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या योग शिष्टाचारानुसार सकाळ, सायंकाळ सत्रामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी किमान अर्धा ते एक तास योगासने करुन व समाजातील सर्व घटकांनी...