अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.14 - अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी मा.पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम,ख्रिश्चन,बौद्ध,शीख,पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्यांक इयत्ता पहिली ते दहावी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेची शैक्षणिक वर्ष 2008 ते 2009- पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे सन 2018-19 या वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या पात्र नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज रविवार दि.30 सप्टेंबर पर्यत www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन भरावयाचे आहेत. इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत व स्वयं अर्थ सहाय्यिता मान्यताप्राप्त् शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त् गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणाची अट लागू राहाणार नाही. पालक...