Posts

निवृत्ती वेतन धारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.23:जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन धारकाची 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याच्या दाखल्याबाबत संबंधित बँकेत यादी पाठविण्यात आलेली आहे.   निवृत्ती वेतन धारकांनी संबंधित बँकेत 1 नोव्हेंबर अथवा त्यानंतर जाऊन त्या यादीवरील आपल्या नावासमोर हयात असल्याबाबत दिनांकासह स्वाक्षरी करावी व आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांकासह नमूद करावे.   तसेच मनीऑर्डरने निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतन धारकांनी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या साक्षांकनासह आधारकार्ड, पॅनकार्ड व मोबाईल क्रमांक नमून करुन हयातीचा दाखला 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत सादर करावेत. त्याचप्रमाणे सन 2018-19 मधील ज्या निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्ती वेतनावरील रक्कम आयकर करप्राप्त आहे अशा निवृत्ती वेतन धारकांनी आपले आयकर बाबत आपली बचतीची कागदपत्र व पॅनकार्ड या कार्यालयाकडे 10 नोव्हेंबर पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला   यांनी केले आहे. 00000

पोलीस स्मृती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.21 : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडीत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पोलीस मुख्यालय अलिबाग येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी ८ वाजता पोलीस मुख्यालय येथे स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना मानवंदना दिली.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल  पारसकर, अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ तसेच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

आज पोलीस स्मृती दिन

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडीत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वा.   पोलीस मुख्यालय अलिबाग येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे, असे सचिन गुंजाळ (म.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक रायगड यांनी कळविले आहे. 00000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 , राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे रविवार दि.21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि.21 रोजी रात्री दीड वा. तुषार शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.  सकाळी अकरा वा. कोळी महासंघ महामेळावा व सत्कार समारंभास उपस्थिती.  स्थळ : पी.एन.पी.नाट्यगृह अलिबाग.  दुपारी एक वा. अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण. 00000

जागतिक अंडी दिवस जिल्ह्यात 52 हजार अंडी वाटप

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20-   जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी जागतिक अंडी दिन (दि.१२) साजरा करण्यात आला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमातून ५२ हजार अंड्यांचे वाटप करण्यात आले व अंड्यांचे आहारातील महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी पाड्यातील शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, आदिवासीपाडा पंचायत समिती सर्व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, राज्यस्तरीय व जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 येथील कार्यक्षेत्रात लोकसहभागातून व अंडी निर्माण करणाऱ्या कुक्कटपालन व्यावसायिकांच्या सहकार्याने 52 हजार अंड्याचे वाटप करण्यात आले.   अंडे हे निसर्ग निर्मित अन्न आहे.   अंड्यामध्ये शरीराची जडणघडण करणारी प्रथीने आणि नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिडस आहेत.   मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या प्रथीने, जीवनसत्वे, खनिजे व स्निग्ध पदार्थ या पोषणमूल्यांचे संतुलित प्रमाण अंड्यांमध्ये असते.    साधारण आकाराच्या कोंबडीच्या अंड्यापासून सरासरी 66 किलो कॅलरी एवढी उर्जा मिळते व ती मानवी आहारात लागणा...

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.17 , राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे शुक्रवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दि.19   रोजी पहाटे एक वा.शासकीय विश्रामगृह रोहा येथे आगमन व राखीव.   सकाळी 6.30 वा. ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळा येथे आगमन व शासकीय मानवंदना सोहळ्यास उपस्थिती.          स. नऊ वा. सौ.मेघना ओक यांचे निवासस्थानी भेट स्थळ : धनगर आळी रोहा.   स.दहा वा. भाजपा कार्यकर्ता संवाद व बैठक.   स्थळ : शासकीय विश्रामगृह रोहा.   दु. बारा वा. रोहा येथून कर्जतकडे प्रयाण.   दु.दोन वा. श्री.पंढरी भोईर, यांच्या हॉटेलचे उद्घाटन. स्थळ : भिसेखिंड, कर्जत.   दु.तीन वा. भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.   दु.4.30 वा.   मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-            शुक्रवार दि. 19 रोजी सकाळी साडे आकरा वा. धावीर देवस्थान ट्रस्ट्र रोहा येथे आगमन. दुपारी साडे बारा   वा. धावीर देवस्थान ट्रस्ट्र रोहा येथून प्रयाण. दु. दीड वा. इंदापूर ता.माणगांव येथे आगमन. दु. साडे तीन वा. इंदापूर, ता.माणगांव येथून प्रयाण. दु.चार वा. द वाई अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.मोर्बा रोड खांदाड माणगांव येथे आगमन. सायं. सहा वा. मोर्बा रोड खांदाड येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सांय. साडे सात वा. एमटीडीसी विश्रामगृहात हरिहरेश्वर येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 20 रोजी सकाळी 10 वा. एमटीडीसी विश्रामगृह येथून हरिहरेश्वर मंदिराकडे प्रयाण. सव्वा दहा वा. हरिहरेश्वर मंदिर येथे आगमन. साडे आकरा वा. हरिहरेश्वर मंदिर येथून प्रयाण. दुपारी बारा वा. आर.पी.दिवेकर हायस्कूल दांडगुरी येथे आगमन. दु. अडीच वा. आर.पी. दिवेकर हायस्कूल दांडगुरी येथून प्रयाण. दुपारी ...