Posts

सामाजिक आरोग्य अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कोविड योध्दा म्हणून लढत आहेत करोना विरुध्दचे युध्द…!

यशकथा क्र.8                                                               दिनांक :- 19 मे 2020         ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत 210 सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू केली होती.    त्यानुसार रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेसाठी 38 सामाजिक आरोग्य अधिकारी नेमण्याची कार्यवाही नुकतीच पूर्ण होऊन   नेमण्यात आलेल्या या सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा   देण्यास सुरुवात   केली आहे.   दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी ग्रा...

कोणताही खंड न पडता स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालकांना घरपोच दिला जात आहे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत पोषण आहार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करीत आहेत प्रेरणादायी काम

Image
यशकथा क्र.7                                                               दिनांक :- 19 मे 2020 देशात व महाराष्ट्रात सध्या करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादूर्भाव झाल्यामुळे शासनाने करोना विषाणूचा राज्यामधील प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये दि.31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू   केला आहे. या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी या राबवित आहेत,त्यास पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांची खंबीर साथ मिळत आहे. संपूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा,प्रसारमाध्यम प्रतिनिधी रायगडवासियांना करोनापास...

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी 1 कोटी 65 लाख 89 हजार 820 रूपयांचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयास वितरीत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश

अलिबाग, जि.रायगड, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यातील श्रीवर्धन व माणगाव, म्हसळा, महाड, कर्जत यासह काही तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून घरांची पडझड झाली होती. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   प्रशासनाला दिले होते. त्याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकसान भरपाई मिळावी, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला होता.    त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी 1 कोटी 65 लाख 89 हजार 820 रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.          नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य (योजनेत्तर) या लेखाशीर्षाखाली सन 2020-21या वित्तीय वर्षासाठी शासन, महसूल व वन विभागाकडून कोकण महसूल विभागास रु.1 कोटी 71 लाख 58 हजार 820 अनुदान प्राप्त झाले होते.   तद्नंतर विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी या निधीचे वितरण करण्यास मंजूरी दिली असून जिल्हाधिकारी रायगड यांना नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, 02, पूर चक्रीवादळे इत्यादी, 113 घरां...

अन् आदिवासी बांधव सुखरूप परतले

अलिबाग,जि.रायगड.दि.19 (जिमाका)– रायगड जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासी कुटुंबासह कोळसा भट्टयांवर चार ते पाच महिने स्थलांतरित होतात. राज्यातील बीड, सोलापूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात त्यांना कंत्राटदार कामासाठी घेऊन जातात. साधारणत: होळीपासून मे महिन्यापर्यंत ते जिल्ह्यात परतू लागतात. मात्र या वर्षी लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले. त्यांना सुखरुप परत आणणे, हे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान होते.   काही ठिकाणाहून मालक, ठेकेदार पळून गेल्यामुळे मजूरांवर उपासमारीची वेळ आली होती. रायगड जिल्हा प्रशासनाने आधी या सर्वांची माहिती घेऊन तेथील जिल्हा प्रशासन व  पोलिसांच्या  मदतीने पाठपुरावा करून  आपल्या जिल्ह्यातील अडकलेल्या मजूरांना मदत पोहोचविली.   आपल्या जिल्ह्यातील एकूण तीस ठिकाणी हे आदिवासी बांधव होते.  त्यात कर्नाटक शासनाने ट्रेन सोडणार नाही, असा निर्णय जाहीर केला. आता या आदिवासी बांधवांना परत कसे आणायचे?यावर प्रशासनाचे प्रयत्न सुरुच होते. याबाबत आदिवासी विकासमंत्री श्री. के. सी. पाडवी यांच्या मार्गदर...

शिकाऊ उमेदवारांच्या 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरावेत

अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका) : शिकाऊ उमेदवारांच्या 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा पुढे ढकलण्यात  आल्याने ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण होत असेल त्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा फॉर्म हे www.apprenticeship.gov.in या पोर्टलवर भरावेत व त्याची प्रिंट ही बीटीआरआय महाड या विभागात लॉकडाऊन उघडल्यानंतर जमा करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, बीटीआरआय, द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यांनी केले आहे. ०००००

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील साई ऐश्वर्या बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या विचुंबे ता.पनवेल येथील सेंट थॉमस शाळेजवळील, साई ऐश्वर्या बिल्डिंग ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 त...

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील कृष्ण वंदना को.ऑ.हौ.सो.इमारत Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या विचुंबे ता.पनवेल येथील कृष्ण वंदना को.ऑ.हौ.सो. ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहि...